बसचा ब्रेक अचानक फेल होतो तेव्हा.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 04:00 PM2018-04-26T16:00:19+5:302018-04-26T16:00:19+5:30

When the bus break suddenly fails ..... | बसचा ब्रेक अचानक फेल होतो तेव्हा.....

बसचा ब्रेक अचानक फेल होतो तेव्हा.....

Next

खामखेडा : मांगबारी घाटात सटाणा - विसापूर गाडीचे ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात येताच चालकाच्या प्रसांगवधानामुळे गावातील प्रवाशाचे प्राण वाचल्याने मोठा अनर्थ टळला. सटाणा आगाराची सटाणा - पिपळदर - खामखेडा- विसापूर बस नेहमी प्रमाणे गुरु वारी सकाळी ७.३० वाजता विसापूरकडे निघाली. पुन्हा विसापुरहून मांगबारी घाटातून सटाण्याकडे येत होती. या बसला सकाळी क्लासेससाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते.तसेच सद्या लग्नसराई असल्याने या बस पूर्ण प्रवाशी व विद्यार्थ्यांनी भरलेली होती. सटाणा मांगबारी घाट चढत असतांना बसचे अचानक ब्रेक फेल झाल्याने बस घाटातून पुढे नेणे शक्य नसल्याचे बस चालक आत्माराम निकम यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गाडीतील प्रवाशांना धीर धरण्याची विनंती केली आणि बस मागे परत मोठ्या चतुराईने मागे उताराच्या रस्त्याने मागे नेत हळूच रस्त्याच्या कडेला उभे केली आणि प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला. यानंतर रस्त्यावर येणारे-आणि जाणारे वाहने थांबवून चालक निकम यांचे कौतुक करून शाबासकी देऊ लागले.या घटनेचे गावात माहिती होताच नागरिकांनी बस बघण्यासाठी गर्दी केली.
------------------
नामपूर -सटाणा -पिपळदर- खामखेडा - बेज-कळवण-नांदुरी-वणी-नाशिक हा राज्य माहामार्ग सतरा नंबरचा रस्ता आहे. या रस्त्या दरम्यान खामखेडा- ते पिपळदर या गावाच्यामघ्ये मांगबारी घाट आहे. या घाटातील रस्ता चढवाचा आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूना खोलगट भाग आहे.तसेच हा रस्ता नाशिक व नांदुरी गडावर जाण्यासाठी जवळा असल्याने या रस्त्यावर साक्र ी, नंदुरबार, नवापूर, धुळे, नामपूर आदी भागातील भाविक नेहमी आदिमाया सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी जातात.त्यामुळे या रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते.

Web Title: When the bus break suddenly fails .....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक