छत्तीस वृक्षांची कत्तल करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:26 PM2018-03-15T12:26:57+5:302018-03-15T12:38:11+5:30

When the action was taken against the slaughtering of six orchards? | छत्तीस वृक्षांची कत्तल करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई केव्हा?

छत्तीस वृक्षांची कत्तल करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई केव्हा?

Next
ठळक मुद्देकलानगर : विश्वकर्मा चॅरिटेबल ट्रस्टने केली मागणी

इंदिरानगर : येथील कलानगर चौकालगत असलेल्या रत्ना हाईट्ससमोर महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर असलेल्या सुमारे छत्तीस वृक्षांची कत्तल करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी श्री विश्वकर्मा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे.
रत्ना हाईट्ससमोरील महापालिकेचा भूखंड सुमारे दहा वर्षांपासून गाजरगवत आणि काटेरी वृक्षांनी व्यापला होता. त्यामुळे मनपाच्या भूखंडास बकाल स्वरूप प्राप्त झाले होते. याची दखल श्री विश्वकर्मा चॅरिटेबल ट्रस्टच्या सर्व सदस्यांनी घेऊन सदर भूखंडावरील गाजरगवत आणि काटेरी वृक्षांची छाटणी करून स्वच्छता मोहीम आणि जमिनीचे सपाटीकरण स्वखर्चाने केले होते. दहा महिन्यांपूर्वी श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त ट्रस्टच्या वतीने छत्तीस झाडांचे रोपण नगरसेवकांच्या हस्ते केले होते. यामध्ये वड, पिंपळ, उंबर, चिंच, सोनचाफा, फणस, पारिजात, मोह यांसह विविध झाडांचा समावेश होता. दर रविवारी आणि बुधवारी ट्रस्टचे सर्व सदस्य पाणी देत होते. ही झाडे आठ फूट उंची एवढी होती. परंतु वीस दिवसांपूर्वी सदर भूखंडावर जॉगिंग ट्रॅक कामाचे भूमिपूजन नगरसेवक सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, अ‍ॅड. श्याम बडोदे, सुप्रिया खोडे, सुनील खोडे, सचिन कुलकर्णी यांसह नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी संबंधित ठेकेदाराला नागरिकांनी आणि प्रभागाच्या नगरसेवकांनी या छत्तीस वृक्षांना कोणतीही हानी न पोहोचवता जॉगिंग ट्रॅकचे काम करावे, अशी सूचना दिली होती. तरीही ठेकेदाराने सर्व वृक्षांची कत्तल करून जमिनीचे सपाटीकरण केले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. संबंधित ठेकेदारावर वृक्षांची कत्तल केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी श्याम विश्वकर्मा, अशोक विश्वकर्मा, राजेंद्र भालेराव, प्रकाश चव्हाण, ओमप्रकाश विश्वकर्मा, राजेश शर्मा, विनोद विश्वकर्मा आदींनी केली आहे.

Web Title: When the action was taken against the slaughtering of six orchards?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.