चांदोरी परिसरात गहू पेरणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2018 12:40 AM2018-11-08T00:40:18+5:302018-11-08T00:40:29+5:30

चांदोरी : निफाड तालुक्यात थंडी वाढायला सुरुवात झाली आहे. चांदोरी व परिसरात शेत वलव्हणी करून गहू पेरणीला सुरुवात झाली आहे. गहू पेरणी नोव्हेंबरच्या अखेरीस व डिसेंबरच्या सुरुवातीला सुरू होत असते; पण पाण्याच्या उपलब्धतेनुसार यावर्षी खूप लवकर पेरणी करण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.

Wheat sowing speed in the Chandori area | चांदोरी परिसरात गहू पेरणीला वेग

चांदोरी परिसरात गहू पेरणीला वेग

googlenewsNext
ठळक मुद्देयंदाच्या वर्षी गहू पेरणीला लवकरात लवकर सुरुवात

चांदोरी : निफाड तालुक्यात थंडी वाढायला सुरुवात झाली आहे. चांदोरी व परिसरात शेत वलव्हणी करून गहू पेरणीला सुरुवात झाली आहे. गहू पेरणी नोव्हेंबरच्या अखेरीस व डिसेंबरच्या सुरुवातीला सुरू होत असते; पण पाण्याच्या उपलब्धतेनुसार यावर्षी खूप लवकर पेरणी करण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.
यावर्षी पावसाने पाठ फिरविली असून, शेतीसाठी पाण्याचा उपलब्ध साठा लक्षात घेऊन व धरणातून येणाºया आवर्तनाचा अंदाज घेऊन यावर्षी शेतकºयांनी खरीप हंगामातील पिके आवरून लगेच गहू, हरभरा, मका, कांदा या रब्बी पिकांची लवकर लागवड केली आहे.
गहू हे रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे पीक असून, शेतकºयांनी
शेत तयार करून व त्यामध्ये
ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी केली जात आहे. यावेळी पाण्याच्या कमतरतेमुळे शेत न वल्व्हता पेरणी केली जात
आहे.
गव्हाचे बियाणे एकरी सरासरी ५० ते ७० किलो लागते त्यासाठी त्यांना किलोसाठी ३५ ते ४० रु पये मोजावे लागत आहे.
गव्हाच्या अजित १०२, लोकवन, श्रीराम १११, आर्या १०६, दिनकर (दिवाणी ७), त्र्यंबक आदी बियाण्यांच्या जाती बाजारामध्ये उपलब्ध आहेत. ट्रॅक्टर पेरणीसाठी वाढत्या महागाई मुळे शेतकºयांना एकरी १३०० ते १५०० रु पये मोजावे लागत आहेत. गहू
पिकासाठी लागणारा खर्च लक्षात घेत चांगला भाव मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहे.पावसाने पाठ फिरविल्याने पुढील काही महिन्यांमध्ये निर्माण होणारे पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेता गेल्यावर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी गहू पेरणीला लवकरात लवकर सुरुवात केली आहे. जे बियाणे कमी पाण्यात जास्त उत्पन्न देईल त्या बियाणांचा वापर होत आहे.
- विजय सावंत, स्थानिक शेतकरी

Web Title: Wheat sowing speed in the Chandori area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी