‘आम्ही एक आहोत, तुम्ही एक रहा’  शेलार कुटुंबीयांचे अनोखे निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:18 AM2018-04-22T00:18:41+5:302018-04-22T00:18:41+5:30

येथील शेलार कुटुंबीयांची लग्नपत्रिका परिसरात चर्चेचा विषय ठरली असून, ‘आम्ही सर्व एक आहोत, तुम्ही एक रहा’चा संदेश देत महापुरुषांचे स्मरण करून देताना आजच्या दुभंगलेल्या समाजामनात बांधिलकी व एकतचे दर्शन यातून घडविले आहे. सदर अनोख्या पत्रिकेचे परिसरात जोरदार स्वागत होत आहे.

'We are one, you are one' Unique inventions of the Shelar family | ‘आम्ही एक आहोत, तुम्ही एक रहा’  शेलार कुटुंबीयांचे अनोखे निमंत्रण

‘आम्ही एक आहोत, तुम्ही एक रहा’  शेलार कुटुंबीयांचे अनोखे निमंत्रण

Next

ओझर/वनसगाव : येथील शेलार कुटुंबीयांची लग्नपत्रिका परिसरात चर्चेचा विषय ठरली असून, ‘आम्ही सर्व एक आहोत, तुम्ही एक रहा’चा संदेश देत महापुरुषांचे स्मरण करून देताना आजच्या दुभंगलेल्या समाजामनात बांधिलकी व एकतचे दर्शन यातून घडविले आहे. सदर अनोख्या पत्रिकेचे परिसरात जोरदार स्वागत होत आहे. आतापर्यंत झाडे लावा, झाडे जगवा, पाणी जपून वापरा, काही सर्पमित्रांनी सापांचे महत्त्व अधोरेखित करत विविध प्रकारच्या आमंत्रणातून सामाजिक संदेश दिले. त्याचे त्यावेळी महत्त्वदेखील कळले. सध्या धर्म, जातपात, गोत्र, भाषा, प्रांतवाद  वैगेरे गोष्टी वैयक्तिक जीवनात सर्वच जण अनुभवत आलो आहोत. आज प्रत्येकाच्या आजूबाजूला विविध भागातील लोक गुण्यागोविंदाने राहतात. एकीकडे इतिहास पाहिल्यास भारतात व त्यातील महाराष्ट्राला महापुरुषांच्या सहवासाची सोनेरी-किनार लाभली आहे, हाच धागा पकडून ओझर येथील ग्रामपंचायतमधील वरिष्ठ कर्मचारी अंबादास शेलार यांनी चिरंजीव भूषणच्यालग्नपत्रिकेवरील रेशीमगाठीचे तोरण सर्वसमाजाच्या एकोप्याचे संदेश देत बांधले जाणार असल्याने तो समाजापुढे एक आदर्शच ठरावा.
आजच्या जीवनशैलीत सामाजिक एकोप्याचे संदेश घरोघरी देणे म्हटले तर ते शक्य नाही, त्यामुळेच अमोलच्या लग्नाचे औचित्य साधून वाढत चाललेली सामाजिक दरी या निमित्ताने कमी होण्यास मदत होईल म्हणूनच पत्रिकेवर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, राष्टÑपिता महात्मा गांधी आणि घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेला आदर्श आपण सर्वांनी एकसंध बांधून ठेवणे काळाची गरज आहे. या महापुरुषांच्या फोटोवर ‘आम्ही सर्व एक आहोत तुम्ही एक रहा’ असे लिहून एकोप्याचा सामाजिक संदेश दिला आहे. -अंबादास शेलार, वरपित्याचे वडील

Web Title: 'We are one, you are one' Unique inventions of the Shelar family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक