इगतपुरी तालुक्यात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 02:16 PM2019-04-24T14:16:29+5:302019-04-24T14:16:36+5:30

घोटी (भास्कर सोनवणे ) : अनेक धरणे आणि अति पर्जन्याचा तालुका म्हणून इगतपुरी तालुक्याची ओळख आहे. मार्चपासूनच यंदा या राज्याच्या राजधानीला पाणी पुरवणाऱ्याा तालुक्यात पाणीटंचाईचे ग्रहण लागले आहे.

Water shortage in Igatpuri taluka | इगतपुरी तालुक्यात पाणीटंचाई

इगतपुरी तालुक्यात पाणीटंचाई

Next

घोटी (भास्कर सोनवणे ) : अनेक धरणे आणि अति पर्जन्याचा तालुका म्हणून इगतपुरी तालुक्याची ओळख आहे. मार्चपासूनच यंदा या राज्याच्या राजधानीला पाणी पुरवणाऱ्याा तालुक्यात पाणीटंचाईचे ग्रहण लागले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील अनेक गावांतील महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागण्याची स्थिती यंदाही बदललेली नाही. असे असतांना नेहमीच पाणी टंचाईने ग्रासलेल्या गावांच्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची भूमिका उदासीन आहे. पाणी टंचाईचा निकष ठरवतांना असलेली नियमावली अनेक वाड्यापाड्यांना जाचक ठरत आहे. तालुक्यातील दारणा नदीलगत आणि लहान, मोठ्या धरणालगत असणार्या अनेक गावांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठी भटकंती होत आहे. महिलांना पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत गावापासून दूरवर अंतरावर असलेल्या विहिरीवरून पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागते.

Web Title: Water shortage in Igatpuri taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक