पाणी आरक्षण ‘जैसे थे’ : पाणीपुरवठ्याचे करावे लागणार सूक्ष्म नियोजनमहापालिकेची पंचाईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 01:07 AM2017-11-19T01:07:32+5:302017-11-19T01:08:56+5:30

नाशिक : जलसंपदा विभागाने महापालिकेसाठी चालू वर्षी गंगापूर आणि दारणा धरणातील ४३०० दलघफू पाणी आरक्षण यंदाही ‘जैसे थे’च ठेवल्याने पालिका प्रशासनाची पंचाईत झाली असून, गंगापूर धरणातून किमान १०० दलघफू पाणी आरक्षण वाढवून मिळण्याची अपेक्षा फोल ठरली आहे. त्यामुळे, महापालिका पाणीपुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन करणार असून, यंदाही पाण्याचा काठोकाठ वापर करावा लागणार आहे.

Water reservation 'like': Due to the micro planning plan which needs water supply | पाणी आरक्षण ‘जैसे थे’ : पाणीपुरवठ्याचे करावे लागणार सूक्ष्म नियोजनमहापालिकेची पंचाईत

पाणी आरक्षण ‘जैसे थे’ : पाणीपुरवठ्याचे करावे लागणार सूक्ष्म नियोजनमहापालिकेची पंचाईत

Next
ठळक मुद्देगंगापूर आणि दारणा धरणातील ४३०० दलघफू पाणी आरक्षण यंदाही ‘जैसे थे’च ठेवल्याने पालिका प्रशासनाची पंचाईत गंगापूर धरणातून किमान १०० दलघफू पाणी आरक्षण वाढवून मिळण्याची अपेक्षा फोल

नाशिक : जलसंपदा विभागाने महापालिकेसाठी चालू वर्षी गंगापूर आणि दारणा धरणातील ४३०० दलघफू पाणी आरक्षण यंदाही ‘जैसे थे’च ठेवल्याने पालिका प्रशासनाची पंचाईत झाली असून, गंगापूर धरणातून किमान १०० दलघफू पाणी आरक्षण वाढवून मिळण्याची अपेक्षा फोल ठरली आहे. त्यामुळे, महापालिका पाणीपुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन करणार असून, यंदाही पाण्याचा काठोकाठ वापर करावा लागणार आहे.
महापालिकेने सन २०१७-१८ या वर्षाकरिता ४६०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी जलसंपदा विभागाकडे केली होती. त्यातील ४,३०० दलघफू गंगापूर धरणातून, तर ३०० दलघफू दारणा धरणातून आरक्षण मिळावे, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला होता. महापालिकेला सन २०१६-१७ या वर्षाकरिता गंगापूर धरणातून ३९०० दलघफू, तर दारणातून ४०० दलघफू पाणी आरक्षण देण्यात आले होते. मात्र, महापालिकेने वर्षभरात गंगापूर धरणातून ३९५० दलघफू, तर दारणातून ३०२ दलघफू पाण्याची उचल केली होती. दारणा धरणातील पाण्याची उचल करताना तांत्रिकदृष्ट्या अडचणी येत असल्याने महापालिकेने ४०० ऐवजी ३०० दलघफू पाण्याची मागणी नोंदवली होती. त्याऐवजी गंगापूर धरणातून पाण्याचे आरक्षण वाढवून देण्याची मागणी केली होती. शहराचा वाढता विस्तार, नवनवीन वसाहतीतून पाण्याची वाढणारी मागणी तसेच यंदाचे वर्ष श्री साईबाबांच्या जन्मशताब्दीचे वर्ष असल्याने शिर्डीला येणाºया भाविकांचा नाशिकवर पडणारा ताण लक्षात घेऊन वाढीव पाणी आरक्षणाची मागणी करण्यात आली होती. परंतु, जलसंपदा विभागाने महापालिकेची मागणी धुडकावून लावत मागील वर्षाप्रमाणेच गंगापूर धरणातून ३९०० दलघफू, तर दारणातून ४०० दलघफू पाणी आरक्षण मंजूर केले. त्यामुळे वाढीव पाणी आरक्षणाची अपेक्षा फोल ठरल्याने महापालिकेची पंचाईत झाली आहे.
परिणामी, महापालिकेला यंदाही आरक्षित पाण्याचा काठोकाठ वापर करणे अपरिहार्य ठरणार आहे. सर्वसाधारणपणे, मे-जून महिन्यात पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे.एकलहरेच्या पाण्याची अपेक्षागंगापूर आणि दारणा धरणातील पाणी आरक्षण निश्चित करताना एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रासाठी ७०० दलघफू पाण्याचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. सन २०१५-१६ मध्ये शहरात पाण्याची भीषण परिस्थिती उद्भवल्यानंतर जलसंपदा विभागाने एकलहरेसाठी आरक्षित पाण्यातील २०० दलघफू पाणी महापालिकेला दिले होते. जून-जुलै २०१८ मध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाल्यास महापालिकेला पुन्हा एकलहरेच्या पाण्याचा आधार मिळू शकतो. त्यामुळे, महापालिका या पाण्याबाबतही अपेक्षा ठेवून आहे.

Web Title: Water reservation 'like': Due to the micro planning plan which needs water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.