पाण्याचा प्रश्न गंभीर, चारा करपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 04:15 PM2018-05-23T16:15:29+5:302018-05-23T16:15:29+5:30

सायखेडा : निफाड-सिन्नर सरहद्दीवरील पिंपळगाव निपाणी,तळवाडे,महाजनपुर, भेंडाळी,औरंगपूर,बागलवाडी या सहा गावांना वर्षानुवर्षे दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. यंदा पर्जन्य चांगला होवुन देखील मार्च महिन्यापासून विहीरींनी तळ गाठला आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

 Water Crises Critical Cramp | पाण्याचा प्रश्न गंभीर, चारा करपला

पाण्याचा प्रश्न गंभीर, चारा करपला

Next

सायखेडा : निफाड-सिन्नर सरहद्दीवरील पिंपळगाव निपाणी,तळवाडे,महाजनपुर, भेंडाळी,औरंगपूर,बागलवाडी या सहा गावांना वर्षानुवर्षे दुष्काळाशी सामना करावा लागत आहे यंदा पर्जन्य चांगला होवुन देखील मार्च महिन्यापासून विहीरींनी तळ गाठला आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. गोदाकाठ भागातील सायखेडा ,चांदोरी, शिंगवे, करंजगाव या गावातून गोदावरी नदीचे खोरे असले तरी नदीच्या खोर्यापासून जेमतेम पंधरा किलोमीटर अंतरावर सिन्नर सरहद्दीवरील गावांचा शिवार उंचावर येत असल्याने वर्षानुवर्षे दुष्काळाचा सामना करावा लागत आहे गावात जलिसंचनाच्या सोयी करूनही सहकारातील सिंचन योजना मोडकळीस आल्या आहे त्यामुळे पाण्याची सोय नसल्याने दुष्काळ येथील नागरिकांच्या पाठीला पुजलेला आहे. यंदा पाऊस चांगला पडला होता त्यामुळे विहीरींनी मार्च मिहन्यापर्यंत तग धरला होता मार्च मिहना संपल्या नंतर पाण्याची टंचाई निर्माण झाली या परिसरासाठी कडवा कॅनॉल हा एकमेव सिंचनाचा प्रकल्प आहे मात्र नियोजनाचा अभाव असल्याने जलसंपदा विभाग पावसाळ्यात सतत पाणी सोडते आण िडिसेंबर मिहन्यापासून एकही आवर्तन सोडत नसल्याने उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title:  Water Crises Critical Cramp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक