शरयूनगरवासीय रस्त्यांच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 12:43 AM2018-06-19T00:43:10+5:302018-06-19T00:43:10+5:30

सुमारे पंधरा वर्षांपासून सुरू शरयूनगरीवासीय रस्त्यांच्या प्रतीक्षेत आहेत. चिखलात, डबक्यात रस्ते हरवले असून, सदर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

 Waiting for Shayununagar Rally | शरयूनगरवासीय रस्त्यांच्या प्रतीक्षेत

शरयूनगरवासीय रस्त्यांच्या प्रतीक्षेत

Next

इंदिरानगर : सुमारे पंधरा वर्षांपासून सुरू शरयूनगरीवासीय रस्त्यांच्या प्रतीक्षेत आहेत. चिखलात, डबक्यात रस्ते हरवले असून, सदर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.  वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील जगन्नाथ चौकापासून सुमारे दोन किमी अंतरावर सुमारे पंधरा वर्षांपूर्वी शरयूनगरी वास्तवात आली. सुमारे अडीचशे घरे असून, त्यामधील शेकडोंच्या संख्येने नागरिक वास्तव्य करीत आहे. परिसरातील शेकडोंच्या संख्येने विद्यार्थी शिक्षण आणि नोकरीसाठी नागरिक शहरात ये-जा करतात. महापालिकेकडून मिळणाऱ्या मूलभूत सुविधांपासून परिसर वंचित आहे.परिसरातील गंभीर समस्या रस्ते बनले आहे. कारण अद्याप साधे कच्चे रस्तेसुद्धा बनवण्यात न आल्याने रस्त्यावर ठीकठिकाणी लहान-मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. तसेच दरवर्षी पावसात रस्ते चिखलाच्या आणि पावसाच्या पाण्याच्या  डबक्यात हरविले जातात. त्यामुळे वाहनधारकांना आणि पादचाºयांना जिकरीचे बनले आहे. त्यातूनच नेहमी लहान-मोठे अपघात घडतात. अनेक वर्षे मनपा प्रशासनाला समक्ष भेटून आणि निवेदन देऊन रस्त्यांची मागणी करूनही अद्यापही धूळखात पडून आहे.
मूलभूत सुविधांचा अभाव
सध्या पाऊस सुरू झाल्याने रस्ते चिखलात हरवले आहेत. त्यामुळे पादचाºयांना आणि वाहनधारकांना चिखल तुडवत मार्गक्र मण करावे लागत आहे. महापालिकेचे सर्व कर भरूनसुद्धा मूलभूत सुविधा मिळत नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मनपा आयुक्तांनी परिसराचा दौरा करून आम्ही महापालिकेत हद्दीत आहे की नाही याचा खुलासा करावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.

Web Title:  Waiting for Shayununagar Rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.