वाडीव-हेजवळ भोजन : ‘शिदोरी’वरच मोर्चेकरी बळीराजाने काढला दिवस अन् रात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 02:40 PM2019-02-21T14:40:55+5:302019-02-21T14:46:30+5:30

सत्ताधारी पक्षाच्या वतीने किंवा सत्ताधारी पक्षाची सत्ता असलेल्या नाशिक महापालिका प्रशासनाकडूनदेखील कुठल्याहीप्रकारची न्याहारी अथवा भोजनाची व्यवस्था या मोर्चेकरी शेतक-यांसाठी करण्यात आलेली नव्हती. केवळ एक पिण्याचा पाण्याचा टॅँकर महामार्ग बसस्थानकावर

Wadiv- Near me food: Bilirak took the day to day and night on 'Shidori' | वाडीव-हेजवळ भोजन : ‘शिदोरी’वरच मोर्चेकरी बळीराजाने काढला दिवस अन् रात्र

वाडीव-हेजवळ भोजन : ‘शिदोरी’वरच मोर्चेकरी बळीराजाने काढला दिवस अन् रात्र

Next
ठळक मुद्देकेवळ एक पिण्याचा पाण्याचा टॅँकर

नाशिक : आपल्या न्याय हक्कासाठी राज्यातील शेतकरी आदिवासी कष्टकरी पुन्हा रस्त्यावर उतरला आहे. बुधवारी राज्यातील विविध जिल्ह्यांमधून दाखल झालेल्या शेतकऱ्यांनी सोबत दोन वेळ नव्हे तर दोन दिवस पुरेल अशी शिदोरी बांधून आणली होती. या शिदोरीच्या आधारे मोर्चेकरी ज्येष्ठ पुरूष महिलांनी बुधवारचा दिवस अन् रात्र नाशिकच्या महामार्ग बसस्थानकात काढली. मागण्यांसंदर्भात कुठलाही तोडगा न निघाल्यामुळे अखेर गुरूवारी सकाळी मोर्चेक-यांनी बसस्थानकाचे आवार न्याहारी न करताच सोडले.

वर्षभरापुर्वी सरकारकडे मांडलेल्या विविध समस्या आणि मागण्यांचे गा-हाणे सरकारने केवळ एका कानाद्वारे ऐकून दुस-या कानाने सोडून दिल्याने पुन्हा या गा-हाण्याचा जाब विचारण्यासाठी एल्गार पुकारला आहे. लाल बावटा घेऊन हजारो कष्टकरी शेतरकी रणरणत्या उन्हात मुंबईच्या दिशेने शासनदरबारी निघाले आहेत. कृषीप्रधान देशाचा पोशिंदा मानला जाणारा शेतकरी, शेतमजूर आदिवासी रस्त्यावर पायी चालत असून सत्ताधारी सरकारच्या मनाला अद्याप पाझर फुटलेला नाही.
सत्ताधारी पक्षाच्या वतीने किंवा सत्ताधारी पक्षाची सत्ता असलेल्या नाशिक महापालिका प्रशासनाकडूनदेखील कुठल्याहीप्रकारची न्याहारी अथवा भोजनाची व्यवस्था या मोर्चेकरी शेतक-यांसाठी करण्यात आलेली नव्हती. केवळ एक पिण्याचा पाण्याचा टॅँकर महामार्ग बसस्थानकावर उपलब्ध करून देण्यापलीकडे कु ठलीही तसदी प्रशासनाकडून घेतली गेली नाही.
शेतकरी मोर्चेकरी दुपार आणि रात्रीचे भोजन आपआपल्या शिदोरीवर भागवून निद्रीस्त झाले. सकाळी उठल्यावर स्वतखर्चाने महामार्गाच्या द्वारावर असलेल्या टपरीवर चहा बिस्किटे खाऊन न्याहारीचे समाधान करून घेतले आणि साडेनऊ वाजतात नेत्यांच्या पाठीमागे मुंबईच्या दिशेने कूच केली.

‘शिदोरी’त नेमके होते तरी काय?
हिरवी मिरची लसणाचा ठेचा अन बाजरीची भाकर, गुळाचा खडा मीठाची पुडी यापलीकडे बहुतांश शेतकऱ्यांच्या शिदोरीमध्ये दुसºया प्रकारचा खाद्यपदार्थ आढळून आला नाही. कारण विविध तालुके जिल्ह्यांमधून प्रवास करून थकलेल्या बळीराजाने महामार्ग बस्थानकावर शिदोरी उघडून दुपारची भूक भागविली. याच शिदोरीचा आधार रात्रीच्या जेवणासाठी घेतला आणि सकाळची न्याहारी न करताच मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले.

नाशिकच्या द्राक्षांची चवच न्यारी...
नाशिकच्या द्राक्षांची चवच न्यारी असल्याचे सांगत परजिल्ह्यांमधून आलेल्या मोर्चेक-यांनी महामार्ग बसस्थानकाच्या आवारात द्राक्ष विक्रेत्यांकडून द्राक्ष खरेदी करत त्याचाही आधार भूक-तहान भागविण्यासाठी घेतल्याच दिसून आले.

चहा अन् गरमागरम पाववडा
महामार्ग बसस्थानकाबाहेर वाफाळलेला चहा अन् गरमागरम वडापावचा दरवळलेला खमंग सुगंधाने अनेक मोर्चेक-यांना मोह आवरता आला नाही. मोर्चेक-यांनी पाववडा, बटाटावडा खाऊन चहाचा आस्वाद घेत न्याहारी आटोपली अन् हातात लाल बावटा घेत घोषणा देत मोर्चात सहभाग नोंदविला.

Web Title: Wadiv- Near me food: Bilirak took the day to day and night on 'Shidori'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.