वडाळागाव : ‘खाकी’वर सराईत गुंडाचा रात्री हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 02:24 PM2019-01-12T14:24:19+5:302019-01-12T14:28:31+5:30

शहा याने जुंद्रे यांची वर्दी धरू न धक्काबुक्की करत शिवीगाळ करण्यास सुरूवात करत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. जुंद्रे यांचे सहकारी पोलीस नाईक कनोजे यांच्याशी झटापट करण्यास सुरूवात केली.

Wadalgaon: A 'gunfight' on 'Khakee' attack on the night | वडाळागाव : ‘खाकी’वर सराईत गुंडाचा रात्री हल्ला

वडाळागाव : ‘खाकी’वर सराईत गुंडाचा रात्री हल्ला

Next
ठळक मुद्दे‘बीट मार्शल’वरच चाल केल्याचा धक्कादायक प्रकार ‘खाकी’चा धाकच राहिला नाही

नाशिक : वडाळागाव परिसरात सराईत गुन्हेगारांची वाढती संख्या आणि त्यांच्याकडून कायदासुव्यवस्थेला लावला जाणारा गालबोट दिवसेंदिवस वाढत चालल्याने सर्वसामान्यांसह पोलिसांनाही त्याचा फटका बसू लागला आहे हे विशेष! मद्यप्राशन करुन मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावर शेकोटी पेटवून बसलेल्या सराईत गुन्हेगाराला हटकले म्हणून त्याने थेट ‘बीट मार्शल’वरच चाल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, महापालिकेच्या घरकुल प्रकल्पाच्या इमारतींजवळ शंभरफूटी रस्त्यालगत शेकोटी पेटवून बसलेला सराईत गुन्हेगार फारुख सुभान शहा हा टोळक्यासह बसलेला बीट मार्शल संतोष जुंद्रे यांना आढळला. शहा सराईत गुन्हेगार असल्याचे लक्षात येताच जुंद्रे यांनी तत्काळ त्याला उठवून हुसकून लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी शहा याने जुंद्रे यांची वर्दी धरू न धक्काबुक्की करत शिवीगाळ करण्यास सुरूवात करत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. जुंद्रे यांचे सहकारी पोलीस नाईक कनोजे यांच्याशी झटापट करण्यास सुरूवात केली. जुंद्रे यांना ढकलल्याने ते जमिनीवर पडल्याने जखमी झाले. तसेच फारुखदेखील बेधुंद अवस्थेत असल्यामुळे तोदेखील खाली पडला अन् त्याला मार लागला. कनोजे यांनी तत्काळ बिनतारी संदेश यंत्रावरुन इंदिरानगर पोलिस ठाण्याशी संपर्क साधत वाढीव बळाची मदत मागितली. मदत येताच पोलिसांनी दोघांना जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. जुंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन इंदिरानगर पोलीस ठाण्यात सराईत गुन्हेगार शहाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘खाकी’चा धाकच राहिला नाही
इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढती गुन्हेगारी बघता ‘खाकी’चा धाकच राहिला नसल्याची चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. चार दिवसांपुर्वी जबरी लूट करुन व्यावसायिकाचा झालेला खून आणि त्यानंतर अशाप्रकारे कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचा-यावर सराईत गुन्हेगाराकडून झालेला हल्ला या दोन्ही घटना गुन्हेगारांची मजल कुठपर्यंत पोहचली आहे व त्यांना खाकीचा धाक कितपत राहिला आहे, हे अधोरेखित करणाºया ठरतात, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

Web Title: Wadalgaon: A 'gunfight' on 'Khakee' attack on the night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.