सोशल मिडियावर व्हायरल : विवाहपत्रिकेला दिले प्रबोधनपत्रकाचे स्वरुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 07:03 PM2018-03-05T19:03:54+5:302018-03-05T19:03:54+5:30

सोशल मिडियाचा वाढता वापर जनप्रबोधनाचे प्रभावी माध्यम ठरू शकतो, हे लक्षात घेऊन तळेक र कुटुंबाने द्वितीय कन्येच्या विवाहची आगळीवेगळी समाजप्रबोधन करणारी निमंत्रण पत्रिका तयार करुन आपल्या मित्र-परिवारापर्यंत व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूकच्या माध्यमातून पोहचविली आहे.

Viral on social media: The nature of the papers given to the wedding | सोशल मिडियावर व्हायरल : विवाहपत्रिकेला दिले प्रबोधनपत्रकाचे स्वरुप

सोशल मिडियावर व्हायरल : विवाहपत्रिकेला दिले प्रबोधनपत्रकाचे स्वरुप

Next
ठळक मुद्देआगळीवेगळी विवाहपत्रिका सध्या सोशल मिडियावर व्हायरल स्वच्छ भारत अभियानाचे बोधचिन्ह असलेला चष्मा, वृक्षांचे छायाचित्रे, बेटी बचाओ, बेटी पढाओचे बोधचिन्हांना विवाहपत्रिकेत स्थानजनप्रबोधनासाठी सोशल मिडियाचा प्रभावी वापर

नाशिक : सध्या माहिती तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात लग्नपत्रिके चे महत्त्व तसे कमी झाले. लग्नपत्रिका छापून वाटण्यापेक्षा ती डिझाईन करुन सोशलमिडियामार्फत आपल्या मित्र-परिवारापर्यंत पोहचविण्यास अधिक प्राधान्य दिले जाते; मात्र हा प्रयोग करताना चांदवड तालुक्यातील पाटे गावातील तळेकर कटुंबियांनी आगळा बदल त्यामध्ये करत लग्नपत्रिकेला थेट प्रबोधपत्रकाचे स्वरुप दिल्याने ही लग्नपत्रिका चर्चेचा विषय ठरत आहे.
सोशल मिडियाचा वाढता वापर जनप्रबोधनाचे प्रभावी माध्यम ठरू शकतो, हे लक्षात घेऊन तळेक र कुटुंबाने द्वितीय कन्येच्या विवाहची आगळीवेगळी समाजप्रबोधन करणारी निमंत्रण पत्रिका तयार करुन आपल्या मित्र-परिवारापर्यंत व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूकच्या माध्यमातून पोहचविली आहे. या कल्पक प्रयोगामुळे कन्येच्या विवाहच्या निमंत्रणासोबतच वृक्षसंवर्धन, मतदानाचा हक्क, बेटी बचाओ, पर्यावरण संवर्धन, जलव्यवस्थापन, समाजसेवा, मुल्यशिक्षण, मतदानाचा हक्क आदि विषयांवर प्रबोधन करणारे संदेश विवाहपत्रिकेच्या माध्यमातून देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाचे बोधचिन्ह असलेला चष्मा, वृक्षांचे छायाचित्रे, बेटी बचाओ, बेटी पढाओचे बोधचिन्हांना विवाहपत्रिकेत स्थान देण्यात आले आहे. सदर आगळीवेगळी विवाहपत्रिका सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाली असून चर्चेचा विषय ठरत आहे.
सोशल मिडियाचा प्रभावी वापर जनप्रबोधनासाठी तळेकर कुटुंबियांनी केला आहे. विवाहच्या निमंत्रणासोबत जनजागृती सहज करता येऊ शकते यासाठी कल्पकबुध्दीने सामाजिक विषयांच्याआधारे विविध संदेशांना विवाहपत्रिकेत स्थान दिल्याने अनोखे निमंत्रण सोशल मिडियावर चांगलेच गाजत आहे.
---

Web Title: Viral on social media: The nature of the papers given to the wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.