रुई येथील महाविद्यालयात ग्रामस्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 06:14 PM2018-12-10T18:14:06+5:302018-12-10T18:14:50+5:30

देवगाव : निफाड तालुक्यातिल रु ई येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यु इंग्लिश स्कुल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात रु ई गांव व परिसराचे ग्रामस्वच्छता आभियान घेण्यात आले.

Village Conservation Campaign at Rui College | रुई येथील महाविद्यालयात ग्रामस्वच्छता अभियान

रु ई येथील न्यु इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने स्वच्छता मोहिम राबवितांना विद्यार्थी व ग्रामस्थ शिक्षक, उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी बाजारतळ, गौमाता मंदिर परिसर, विठ्ठल मंदिर परिसर, मुख्य रस्ता इत्यादी परिसर स्वच्छ केले.

देवगाव : निफाड तालुक्यातिल रु ई येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यु इंग्लिश स्कुल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात रु ई गांव व परिसराचे ग्रामस्वच्छता आभियान घेण्यात आले.
प्राचार्य नंदकुमार देवढे यांच्या मार्गदर्शनाने व प्रकल्प प्रमुख घनश्याम मोरे यांच्या नियोजनातून हा उपक्र म राबविण्यात आला.याप्रसंगी सकाळी ठीक 8 वाजता स्थानिक स्कुल कमिटींच्या सदस्यांच्या उपस्थितीत प्रभात फेरी काढण्यात आली.यानंतर रु ई-धानोरे ग्रुप ग्रामपंचायतीतर्फे कचरा गोळा करण्यासाठी फिरवील्या जाणार्या घंटागाडीचा वापर करु न विद्यार्थ्यांनी परिसरातील कचरा गोळा करण्यात आला याप्रसंगी गावातील अनेक नागरिकही सहभागी झाले होते. याप्रसंगी उपसरपंच बाळासाहेब गायकवाड, सोमनाथ गायकवाड, शिवाजी रोटे इतर नागरिकांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी बाजारतळ, गौमाता मंदिर परिसर, विठ्ठल मंदिर परिसर, मुख्य रस्ता इत्यादी परिसर स्वच्छ केले.
ग्रामस्वच्छता अभियानाप्रसंगी उपशिक्षक पंडित धोंडगे यांनी ग्रामस्वच्छतेचे महत्त्व"या विषयावर विठ्ठल मंदिर परिसरात उपस्थितांसमोर आपले मनोगत व्यक्त केले.ग्रामस्वच्छता आटोपल्यानंतर विद्यार्थ्यांना अल्पोपहार वाटण्यात आला.
अभियानाप्रसंगी विद्यालयातील गोरक्ष तेलोरे, देवदत्त बोरसे, अशोक हिंगे, सुभाष गायकवाड, पद्मावती काळे, सुनिता पाडवी, प्रकाश पाळंदे व शिक्षकवृंद उपस्थित होते. प्रदिप लोणारी यांनी सर्वांचे आभार मानले.
 

Web Title: Village Conservation Campaign at Rui College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.