विधार्थी मेळावा उस्तवात .....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 05:05 PM2018-11-19T17:05:17+5:302018-11-19T17:05:51+5:30

पिंपळगाव बसवंत : आजकालच्या धकाधकीच्या जीवनात वर्गिमत्र, मैत्रिणी भेटणे दुर्मिळ झाले असून, सतरा वर्षानंतर जनता विद्यालयातील २००१ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा मेळावा पिंपळगाव बसवंत परिसरातील करी लिव्हस हॉटेलमध्ये उत्साहात पार पडला. माजी विद्यार्थ्यांनी मेळव्यात जुन्या आठवणींना उजाळा देत मनमोकळा संवाद साधला शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी प्रश्नावलीचे आयोजन करण्यात आले होते.

Vidyarthi Melava emerges ..... | विधार्थी मेळावा उस्तवात .....

पिंपळगाव बसवंत येथील जनता विद्यालयातील २००१ च्या दहावी मधील बॅचचे माजी विधार्थी, विधार्थिनी व शिक्षक आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देजनता विद्यालयातील विद्यार्थी-शिक्षक १७ वर्षांनंतर पुन्हा शाळेत

पिंपळगाव बसवंत : आजकालच्या धकाधकीच्या जीवनात वर्गिमत्र, मैत्रिणी भेटणे दुर्मिळ झाले असून, सतरा वर्षानंतर जनता विद्यालयातील २००१ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा मेळावा पिंपळगाव बसवंत परिसरातील करी लिव्हस हॉटेलमध्ये उत्साहात पार पडला.
माजी विद्यार्थ्यांनी मेळव्यात जुन्या आठवणींना उजाळा देत मनमोकळा संवाद साधला शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी प्रश्नावलीचे आयोजन करण्यात आले होते.
सामाजिक भावनेतून प्रत्येकाला कशी मदत करता येईल हे या मेळाव्याचा विशेष हेतू होता. उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. हे विध्यार्थी आज आपआपल्या निवडलेल्या क्षेत्रात कार्यरत आहेत. कुणी उत्कृष्ठ बागायतदार, कुणी व्यावसायिक तर काही नोकरी निमित्त बाहेरगावी स्थायिक झाले आहेत. तरी सुद्धा फक्त एका फोन व मोबाईल संदेश ने सतरा वर्षांनंतर एकत्र भेटून जुन्या आठवणीना उजाळा दिला.
यावेळी शिक्षिका थेटे, निकम, आहेर, नांद्रे ठोंबरे, दोंडकर आदी सह विध्यार्थीनी भाग्यश्री भंडारे, प्रांजळ आथरे, सुवर्णा डेरे, वैशाली निरगुडे, संध्या गायकवाड, कविता वाटपाडे, गिरीष मोगल आदी उपस्थित होते. कार्यक्र म यशस्वीतेसाठी वैभव पाखले, निखिल भालेराव, प्रितीश छाजेड, विक्र ांत मोरे यांनी प्रयत्न केले. सुत्रसंचालन वैभव पाखले यांनी तर आभार राहुल तिडके यांनी मानले.
 

Web Title: Vidyarthi Melava emerges .....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.