विधान परिषद : शिक्षक मतदारसंघासाठी प्रतापदादा सोनवणे, ठाकरेंची तयारी भाजपात इच्छुकांची मोर्चेबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:22 AM2017-12-18T01:22:07+5:302017-12-18T01:23:03+5:30

विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघातून उमेदवारीसाठी विविध पक्षांच्या शिक्षक संघटनांमधील इच्छुकांमध्ये स्पर्धा सुरू असताना त्यात आता मूळ पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची भर पडली आहे.

Vidhan Parishad: Pratapada Sonawane for Teachers Constituency, Preparation of Thackeray for BJP's Front | विधान परिषद : शिक्षक मतदारसंघासाठी प्रतापदादा सोनवणे, ठाकरेंची तयारी भाजपात इच्छुकांची मोर्चेबांधणी

विधान परिषद : शिक्षक मतदारसंघासाठी प्रतापदादा सोनवणे, ठाकरेंची तयारी भाजपात इच्छुकांची मोर्चेबांधणी

Next
ठळक मुद्देनिवडणूक पुढील वर्षी होणारसंघटनांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणे सुरूभाजपाने पुन्हा संधी नाकारली

नाशिक : विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघातून उमेदवारीसाठी विविध पक्षांच्या शिक्षक संघटनांमधील इच्छुकांमध्ये स्पर्धा सुरू असताना त्यात आता मूळ पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची भर पडली आहे. माजी आमदार आणि खासदार प्रतापदादा सोनवणे तसेच अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी तयारी सुरू केली आहे. तर राष्टÑवादीच्या वतीने संदीप बेडसे हेदेखील दावेदारी करीत आहेत.
विधान परिषदेच्या नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पुढील वर्षी होणार आहे. पाच जिल्ह्यांचा हा मतदारसंघ असल्याने उमेदवारी अगोदरच घोषित करणे क्रमप्राप्त ठरते. दरम्यान, या निवडणुकीसाठी शिक्षक भरती, शिक्षक परिषद, टीडीएफ या पक्षांमधील शिक्षक नेते प्रयत्नशील असून, काही संघटनांमध्ये तर उमेदवारी घोषित करण्यावरून रण पेटले आहे. अशा स्थितीत मूळ पक्षातील नेतेही स्पर्धेत उतरले आहेत. यापूर्वी पदवीधर मतदारसंघातून दोनवेळा प्रतिनिधित्व करणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रतापदादा सोनवणे आणि त्याचप्रमाणे मविप्रचे माजी सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी त्यासाठी कंबर कसली असून, उभयतांनी शिक्षण संस्था चालकांच्या तसेच शिक्षक संघटनांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले आहे. त्यामुळे राजकीय स्पर्धा तीव्र झाली आहे. प्रतापदादा सोनवणे यांनी विधान परिषदेच्या मतदारसंघातून यश मिळवल्यानंतर धुळे लोकसभा मतदारसंघात यश मिळवून त्याचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांना वयाचे आणि प्रकृतीचे कारण दाखवून भाजपाने पुन्हा संधी नाकारली होती. त्यानंतर त्यांनी तापी खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपदही मागितले, परंतु पक्षाने हिरवा कंदील दिला नाही. पदवीधरसाठी ते पुन्हा इच्छुक असताना पक्षाने केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचे निकटवर्तीय असलेल्या डॉ. प्रशांत पाटील यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातल्यामुळे प्रतापदादा सोनवणे नाराज झाले. त्याचबरोबर अशाच प्रकारे पदवीधरसाठी इच्छुक असलेल्या अ‍ॅड. नितीन ठाकरेयांचीही तीच गत झाली.
काही इच्छुकांचा प्रचार
राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने संदीप बेडसे दावेदार असून, त्यांनीदेखील प्रचार सुरू केला आहे. विशेष म्हणजे बेडसे हे राष्टÑवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे एकेकाळी स्वीय सहायक होते. शासकीय सेवेचा राजीनामा देऊन त्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत धुळे जिल्ह्यातून भवितव्य आजमावले होते. परंतु जयकुमार रावळ यांच्यासमोर त्यांचा टिकाव लागला नाही. मात्र आता शिक्षक मतदारसंघासाठी ते दावेदार करीत आहेत.

Web Title: Vidhan Parishad: Pratapada Sonawane for Teachers Constituency, Preparation of Thackeray for BJP's Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.