वाहन सुरक्षा : सिन्नर बाजार समितीत उपक्रम, हलगर्जीपणा करणाºयांंवर कारवाईची मागणी अपघात टाळण्यासाठी आता रिफ्लेक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 01:02 AM2018-01-20T01:02:48+5:302018-01-20T01:03:25+5:30

सिन्नर : शेतमाल घेऊन बाजार समितीच्या आवारात येणाºया बैलगाड्यांसह प्रत्येक वाहनांना रिफ्लेक्टर बसविण्याची सूचना माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी केली.

Vehicle Safety: Action to take action against the defaulters in the Sinnar market committee, demanding to avoid the accident, now the reflector | वाहन सुरक्षा : सिन्नर बाजार समितीत उपक्रम, हलगर्जीपणा करणाºयांंवर कारवाईची मागणी अपघात टाळण्यासाठी आता रिफ्लेक्टर

वाहन सुरक्षा : सिन्नर बाजार समितीत उपक्रम, हलगर्जीपणा करणाºयांंवर कारवाईची मागणी अपघात टाळण्यासाठी आता रिफ्लेक्टर

Next
ठळक मुद्देवाहन सुरक्षा व घ्यावयची काळजीप्रबोधन केल्यास अपघाताचे प्रमाण कमी

सिन्नर : शेतमाल घेऊन बाजार समितीच्या आवारात येणाºया बैलगाड्यांसह प्रत्येक वाहनांना रिफ्लेक्टर बसविण्याची सूचना माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी केली. सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घेऊन शेतकºयांच्या आयुष्याची काळजी घ्यावी, वाहनांना रेडिअम व रिफ्लेक्टर लावण्यासाठी बाजार समितीने कर्मचाºयांची नियुक्ती करावी, यात हलगर्जीपणा झाल्यास त्यावर प्रशासनाने कडक कारवाई करावी, असे आवाहन कोकाटे यांनी केले. प्रादेशिक परिवहन कार्यालय, सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती, आतिष मोटार ड्रायव्हिंग स्कूल, अभिजित इंजिनिअरिंग वर्क्स व किसान ट्रेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात वाहन सुरक्षा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कोकाटे यांनी वाहन सुरक्षा व घ्यावयची काळजी यावर शेतकºयांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, तहसीलदार नितीन गवळी, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, बाजार समितीचे उपसभापती सोमनाथ भिसे, शिवाली सोमवंशी, निर्मला वसावे, सुनील गवळी, राजेंद्र गवळी, सदाशिव वाघ, सदाशिव वाघ, माणिक गाडे, राजेेंद्र राजगुरु, संतोष राजगुरु, सचिव विजय विखे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून भरत कळसकर आल्यानंतर त्यांच्या उपक्रमामुळे अपघात कमी झाल्याचे कोकाटे म्हणाले. कायद्यामुळे दंडात्मक कारवाई होईल, मात्र वाहनचालकांचे प्रबोधन केल्यास अपघाताचे प्रमाण कमी होईल, असे कोकाटे म्हणाले. आयुष्यमान वाढविण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत; मात्र अपघातात अनेक तरुणांचा बळी जात असल्याबाबत त्यांनी जागृती करण्याचे आवाहन केले.
वाहतुकीचे नियम पाळून अपघात टाळावे असे ते म्हणाले. याप्रसंगी बैलगाडी, ट्रॅक्टर व शेतमाल विक्रीसाठी आलेल्या वाहनांना रेडिअम व रिफ्लेक्टर बसविण्यात आले. उपसभापती सोमनाथ भिसे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, शिवाली सोमवंशी यांनी उपस्थित शेतकºयांचे प्रबोधन केले. यावेळी संचालक विनायक तांबे, विनायक घुमरे, शांताराम कोकाटे, संजय खैरनार, सुधाकर शिंदे, सविता उगले, नगरसेवक वासंती देशमुख यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुचाकी सर्वांत धोकादायक
अनेकदा अपघात झाल्यानंतर अगोदर आरटीओला शिवी दिली जाते. तुम्हाला लायसन्स कोणी दिले ? असेही विचारले जाते; मात्र लायसन्स देताना चालकाच्या मनाची चाचणी आम्ही घेत नसल्याचे प्रादेशिक अधिकारी भरत कळसकर यांनी सांगितले. चालक वाहतुकीचे नियम पाळत नाही, त्यामुळे अपघात होत असल्याचे ते म्हणाले. दुचाकी सर्वांत धोकादायक वाहन असल्याचे ते म्हणाले. त्यासाठी हेल्मेट वापरण्याचा आग्रह कळसकर यांनी केला. दंडात्मक कारवाई फारशी यशस्वी होत नाही. त्यासाठी चालकांच्या मनाचे प्रबोधन होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Vehicle Safety: Action to take action against the defaulters in the Sinnar market committee, demanding to avoid the accident, now the reflector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.