पालेभाज्यांची ४० टक्के आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:46 AM2018-03-24T00:46:01+5:302018-03-24T00:46:01+5:30

उन्हाळ्याची चाहूल लागताच शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडत असल्याने पालेभाज्या मालाची आवक घटत चालली आहे. गुरुवारी (दि.२२) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबीरसह, मेथी, शेपू, कांदापातला समाधानकारक बाजारभाव मिळाला.

Vegetables fall by 40 percent | पालेभाज्यांची ४० टक्के आवक घटली

पालेभाज्यांची ४० टक्के आवक घटली

googlenewsNext

पंचवटी : उन्हाळ्याची चाहूल लागताच शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडत असल्याने पालेभाज्या मालाची आवक घटत चालली आहे.  गुरुवारी (दि.२२) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबीरसह, मेथी, शेपू, कांदापातला समा धानकारक बाजारभाव मिळाला.  बाजार समितीत कोथिंबीर ३६ रुपये, मेथी २३, शेपू २३, तर कांदापात २० रुपये प्रति जुडी दराने विक्री झाली. मार्च महिना सुरू झाल्याने शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडत चालले आहे, तर वाढत्या उन्हामुळे शेतातील पिके कर पत असल्याने सर्वच पालेभाज्यांची आवक घटत चालली आहे. आगामी काळात शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडण्याची दाट शक्य ता असल्याने पालेभाज्यांची आवक आणखी मोठ्या प्रमाणात घटून बाजारभाव तेजीत येण्याची शक्यता असल्याने ग्राहकांना पाले भाज्या खरेदी करताना खिशाचा विचार करावा लागणार आहे. गेल्या आठवड्यापासून उन्हाच्या झळा वाढत चालल्याने पालेभाज्यांना पाणी कमी पडत असल्याने आवक घटली आहे, असे व्यापारी नितीन लासुरे यांनी सांगितले.

Web Title: Vegetables fall by 40 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.