वसाका प्राधिकृत मंडळ बरखास्तीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 01:29 AM2018-05-28T01:29:14+5:302018-05-28T01:29:14+5:30

वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यास ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादकांचे व पूर्ण क्षमतेने काम करणाºया कामगार व इतर घटकांचे पैसे देण्यासाठी वसाका प्राधिकृत अधिकारी आमदार डॉ. राहुल अहेर व प्राधिकृत मंडळ असमर्थ असून, केवळ प्रतिकूल परिस्थितीचा गैरफायदा घेत असल्याने वसाकाला भविष्य नाही, निश्चित धोरण नसल्याने वसाका उर्जित अवस्थेत येणार नाही त्यामुळे वसाका प्राधिकृत मंडळ बरखास्त करावे व वसाका खासगी उद्योजकांना चालविण्यास द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, राष्ट्रवादी काँग्रेसचे देवळा तालुकाध्यक्ष पंडितराव निकम, वसाका बचाव परिषदेचे निमंत्रक सुनील देवरे, ऊस उत्पादक संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी केली आहे. याबाबत सहकार व पणनमंत्री चंद्रकांत पाटील, साखर आयुक्त पुणे यांना निवेदन देण्यात आले आहे.

 Vasaka Authorization Board Dismissal Demand | वसाका प्राधिकृत मंडळ बरखास्तीची मागणी

वसाका प्राधिकृत मंडळ बरखास्तीची मागणी

Next

कळवण : वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यास ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादकांचे व पूर्ण क्षमतेने काम करणाºया कामगार व इतर घटकांचे पैसे देण्यासाठी वसाका प्राधिकृत अधिकारी आमदार डॉ. राहुल अहेर व प्राधिकृत मंडळ असमर्थ असून, केवळ प्रतिकूल परिस्थितीचा गैरफायदा घेत असल्याने वसाकाला भविष्य नाही, निश्चित धोरण नसल्याने वसाका उर्जित अवस्थेत येणार नाही त्यामुळे वसाका प्राधिकृत मंडळ बरखास्त करावे व वसाका खासगी उद्योजकांना चालविण्यास द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, राष्ट्रवादी काँग्रेसचे देवळा तालुकाध्यक्ष पंडितराव निकम, वसाका बचाव परिषदेचे निमंत्रक सुनील देवरे, ऊस उत्पादक संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी केली आहे. याबाबत सहकार व पणनमंत्री चंद्रकांत पाटील, साखर आयुक्त पुणे यांना निवेदन देण्यात आले आहे.  वसाका कारखान्यास ऊस उत्पादकांनी ऊस पुरवठा केला; मात्र उसाचे पेमेंट मिळत नाही त्यामुळे संतप्त झालेल्या ऊस उत्पादकांनी वसाका कार्यस्थळावर सुरुवातीला दोन तास ठिय्या आंदोलन केले. आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दिलेल्या आश्वासनांची पूर्ती झाली नाही. त्यामुळे वसाका कार्यस्थळावर पुन्हा आंदोलन करण्यात येऊन कुलूप लावण्यात आले; मात्र केलेल्या आंदोलनाने वसाकाचे कोणतेही नुकसान झालेले नसताना न झालेल्या नुकसानीबाबत आमदार डॉ. राहुल अहेर चुकीची माहिती देत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार व सुनील देवरे यांनी यावेळी सांगितले.  प्रतिकूल परिस्थिती असल्याने ऊस उत्पादकांनी वसाकाला ऊस पुरवठा केला. ऊस उत्पादकांना चार महिने झाले तरी उसाचे पेमेंट मिळत नाही त्यामुळे संतप्त झालेल्या ऊस उत्पादकांनी वसाका कार्यस्थळावर दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. आमदार डॉ. राहुल अहेर यांनी ऊस उत्पादकांचे पेमेंट देण्याचे आश्वासन पाळले नाही. केवळ आंदोलन म्हणून ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी वसाकाला कुलूप ठोकले. यात किती व कोणते नुकसान झाले. यापेक्षा आपण कारखाना, ऊस उत्पादक व कामगार यांचे किती नुकसान केले आहे हे आता स्पष्ट झाले असल्याचे गोविंद पगार व सुनील देवरे यांनी यावेळी सांगितले.  कार्यक्षेत्रात ऊस उपलब्ध असतांना कारखाना प्रतिकूल परिस्थितीत असल्याचे दाखवून प्राधिकृत मंडळाकडून उदासीन धोरण स्वीकारले जात आहे. ऊस उत्पादकांचे अर्थकारण धोक्यात आले आहे. आजारी कारखाना यादीत सतत वसाकाचे नाव झळकून आर्थिक कोंडी केली जात असेल तर प्राधिकृत मंडळाची कारखान्यास आवश्यकता नसल्याचे पगार व देवरे म्हणाले.  कारखान्यात १५० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची अनियमितता झाली असतांना प्राधिकृत मंडळ चौकशीची मागणी करीत नसल्याने याप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल करण्यात येणार आहे असे ते म्हणाले.
शासन निर्णय
जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरु होण्यापूर्वी शासकीय नियोजन सभेत वसाकाचे प्रतिनिधी उपस्थित नसल्याने ऊस भाव, उसाची उपलब्धता ७०-३० प्रस्ताव, कर्ज उभारणी, स्वतंत्र आय टी विभाग याप्रश्नी कोणतीही कार्यवाही प्रशासनाने न केल्याने अडचणी अधिक वाढल्या. ऊस उत्पादकांचे व कार्यक्षेत्राचे नुकसान झाले. शासन धोरणानुसार व्यवस्थापनाने धोरण स्वीकारणे सक्तीचे करावे अशी मागणी गोविंद पगार व सुनील देवरे यांनी साखर आयुक्तांकडे केली आहे.

Web Title:  Vasaka Authorization Board Dismissal Demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.