बंद पडलेल्या पाणी वापर उपसा सिंचन संस्थाना मिळणार हक्काचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 02:13 PM2019-01-11T14:13:27+5:302019-01-11T14:14:10+5:30

ओझर : निफाड तालुक्यातील गंगापूर प्रकल्पावरील बंद उपसा जलसिंचन योजनेचे पाणी कालव्यावर वर्ग करून उपसा सिंचन योजनांच्या सभसदांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे दालनातील बैठकीत निर्णय घेण्यात आला.

 The use of the damaged water will be given to the irrigation institutions | बंद पडलेल्या पाणी वापर उपसा सिंचन संस्थाना मिळणार हक्काचे पाणी

बंद पडलेल्या पाणी वापर उपसा सिंचन संस्थाना मिळणार हक्काचे पाणी

Next

ओझर : निफाड तालुक्यातील गंगापूर प्रकल्पावरील बंद उपसा जलसिंचन योजनेचे पाणी कालव्यावर वर्ग करून उपसा सिंचन योजनांच्या सभसदांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे दालनातील बैठकीत निर्णय घेण्यात आला.
बैठकीत निफाड तालुक्यातील गंगापूर प्रकल्पावरील बंद उपसा जलसिंचन योजनेचे पाणी कालव्यावर वर्ग करून उपसा सिंचन योजनांच्या सभासदांना पाणी उपलब्ध करून देणेबाबत शिवतारे यांनी जिल्हा प्रशासनास तसे आदेश दिले व येत्या आठ दिवसात याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य अभियंता आर.एम.मोरे यांना दिले. बंद पडलेल्या उपसा सिंचन योजनांपैकी मामलेश्वर उपसा सिंचंन योजना,पिंपळस , गुरुदत्त उपसा सिंचंन योजना, सुकेणे व चितळेश्वर उपसा सिंचंन योजना, चितेगाव ता.निफाड या तीन योजनांचे लाभक्षेत्र पुन्हा कालव्यांवर वर्ग करून पाणी उपसा सिंचन योजना अधिकृत करण्यासाठी प्रस्ताव पुढील महिन्याच्या दहा फेब्रुवारीच्या आत शासनास पाठविण्यात यावे असे निर्देश जिल्हा प्रशासनास देण्यात आले. बैठकीस आमदार अनिल कदम, जलसंपदा विभाग लाभक्षेत्र विंकासचे सचिव आर.एम.मोरे, उत्तर महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य अभियंता आर.एस.शिंदे उपस्थित होते.
---------------------
निफाड तालुक्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला असल्याने गोदाकाठ भागात महाजनपूर भेंडाळी या टंचाईग्रस्त भागात कडवा धरणातून पाईपलाईनद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आठ दिवसात प्रस्ताव सादर होईल. गंगापुर प्रकल्पावरील बंद उपसा जलसिंचन योजनेचे पाणी कालव्यावर लवकरच वर्ग केले जाणार आहे. यामुळे सदर परिसराला पाणी टंचाईच्या झळा नाहीशा होतील व शेतीला नवसंजीवनी मिळेल.
-अनिल कदम, आमदार, निफाड.

Web Title:  The use of the damaged water will be given to the irrigation institutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक