महाराष्ट्र भुषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 07:47 PM2018-10-16T19:47:17+5:302018-10-16T19:50:30+5:30

लासलगाव : सदृढ भारत देश घडविण्याचे काम महाराष्ट्र भुषण तिर्थरु प डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान कडून सुरू असून या कार्याची नोंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली आहे त्यांच्या प्रतिमेचे अनावरण लासलगाव ग्रामपंचायत मध्ये होत आहे ही अत्यंत गौरवास्पद बाब असल्याचे प्रतिपादन निफाडचे आमदार अनिल कदम यांनी केले.

Unveiling the image of Maharashtra Bhushan Nanasaheb Dharmadhikari | महाराष्ट्र भुषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे अनावरण

महाराष्ट्र भुषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिमेचे अनावरण लासलगाव ग्रामपंचायत कार्यालयात करतांना अनिल कदम, समवेत जयदत्त होळकर, उन्मेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य, विविधगावचे सरपंच आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देलासलगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रथम सोहळा संपन्न

लासलगाव : सदृढ भारत देश घडविण्याचे काम महाराष्ट्र भुषण तिर्थरु प डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान कडून सुरू असून या कार्याची नोंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली आहे त्यांच्या प्रतिमेचे अनावरण लासलगाव ग्रामपंचायत मध्ये होत आहे ही अत्यंत गौरवास्पद बाब असल्याचे प्रतिपादन निफाडचे आमदार अनिल कदम यांनी केले.
लासलगाव ग्रामपंचायत येथे मंगळवारी (दि.१६) तिर्थरुप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे अनावरण निफाडचे आमदार अनिल कदम यांच्या हस्ते व लासलगाव ग्रामपालिका चे उपसरपंच जयदत्त होळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील, बाजार समितीचे संचालक, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, विविध गावचे सरपंंचच व्यासपीठावर उपस्थित होते. गेली ७५ वर्ष समाज प्रबोधन करण्याचे काम ज्यांनी केले असे तिर्थरु प डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे अनावरण आपल्या हातून होत आहे हे माझे भाग्य असल्याचे आमदार कदम यांनी सांगितले आमच्यासारखे राजकारणी हे स्वच्छता करण्यासाठी उपदेश करतात मात्र या प्रतिष्ठान यांचेकडून प्रत्यक्ष कृती केली जाते त्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न राजकारण्यांनी करण्याची गरज असल्याचे यावेळी कदम यांनी स्पष्ट केले. चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील यांनी देखील प्रतिष्ठानच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या सुरू असलेल्या कार्यास सदिच्छा व्यक्त केल्या. लासलगाव बाजार समितीच्या वतीने नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावे भव्य प्रवेशद्वार उभारले जात असून याकरिता आप्पासाहेब किंवा सचिनदादा धर्माधिकारी यांना उद्घाटन सोहळ्यासाठी आमंत्रित करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिमेचे अनावरण सोहळ्यासाठी जिल्हाभरातून सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Web Title: Unveiling the image of Maharashtra Bhushan Nanasaheb Dharmadhikari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक