अज्ञात इसमांनी तीन देऊळ परिसरातील कांदा जाळला येवला : सुमारे ६० ते ७० हजारांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:15 AM2017-12-30T00:15:14+5:302017-12-30T00:16:50+5:30

येवला : येथील तीन देऊळ परिसरातील कांदा व्यापारी यांच्या कांद्याने भरलेल्या ट्रकमध्ये अज्ञात इसमाने रात्री १ ते १.३० वाजे दरम्यान आग लावल्याने सुमारे ६० ते ७० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली.

Unknown tooth burns in three temple areas: loss of about 60 to 70 thousand | अज्ञात इसमांनी तीन देऊळ परिसरातील कांदा जाळला येवला : सुमारे ६० ते ७० हजारांचे नुकसान

अज्ञात इसमांनी तीन देऊळ परिसरातील कांदा जाळला येवला : सुमारे ६० ते ७० हजारांचे नुकसान

Next
ठळक मुद्देगाडीची चावी देऊन ड्रायव्हर घरी ६० ते ७० हजार रुपये नुकसान

येवला : येथील तीन देऊळ परिसरातील कांदा व्यापारी यांच्या कांद्याने भरलेल्या ट्रकमध्ये अज्ञात इसमाने रात्री १ ते १.३० वाजे दरम्यान आग लावल्याने सुमारे ६० ते ७० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली.
येथील कांदा व्यापारी मोहन पंजाबी यांनी मनमाड येथून कांदा आंध्र प्रदेश येथील वरंगल येथे पाठविण्यासाठी सुमारे ३ लाख रु पये किमतीचा कांदा खरेदी केला व कांद्याने भरलेला ट्रक त्यांच्या तीन देऊळ परिसरातील राहत्या घरी रात्री ८ वाजेच्या सुमारास आणून लावला व पहाटे लवकर जाण्यासाठी गाडीची चावी देऊन ड्रायव्हर घरी गेला. मात्र रात्री १ ते १.३० वाजेच्या सुमारास गाडीतून कांदे पडण्याच्या आवाजाने मोहन पंजाबी यांना जाग आली व त्यांनी गाडीकडे पाहिले असता गाडीतील कांदा आगीत जळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ आपल्या राहत्या घराच्या गॅलरीतून गाडीवर पाण्याचा मारा केला व आग विझविण्याचा प्रयत्न करून आग विझवली. गाडीतील बºयाच प्रमाणात कांदा खराब झाल्याने सुमारे ६० ते ७० हजार रुपये नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. रात्री २ वाजेच्या दरम्यान पोलिसांना या घटनेची माहिती देऊन या घटनेचा पंचनामा करण्यात आला. याबाबत येवला शहर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास येवला शहर पोलीस ठाण्यांतर्गत सुरू आहे.

Web Title: Unknown tooth burns in three temple areas: loss of about 60 to 70 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा