‘आम्ही साऱ्या जणी’तर्फे अनोखे मातृदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 12:55 AM2018-06-14T00:55:55+5:302018-06-14T00:55:55+5:30

अधिकमासानिमित्त येथील ‘आम्ही साºया जणी’ या सामाजिक संस्थेच्या वतीने ‘मातृपूजन’ सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पंचाहत्तरी गाठलेल्या, परंतु विविध क्षेत्रांत विशेष कर्तृत्व गाजविणाºया २७ महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 Unique Motherhood by 'We Were Surya' | ‘आम्ही साऱ्या जणी’तर्फे अनोखे मातृदर्शन

‘आम्ही साऱ्या जणी’तर्फे अनोखे मातृदर्शन

googlenewsNext

नाशिक : अधिकमासानिमित्त येथील ‘आम्ही साºया जणी’ या सामाजिक संस्थेच्या वतीने ‘मातृपूजन’ सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पंचाहत्तरी गाठलेल्या, परंतु विविध क्षेत्रांत विशेष कर्तृत्व गाजविणाºया २७ महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सुनंदा पटवर्धन उपस्थित होत्या. प्रारंभी सीमा शिंपी यांनी नारायण सुर्वे यांची ‘आई’ ही कविता सादर केली. संजीवनी कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. वृंदा लवाटे यांनी सूत्रसंचालन केले. पद्मा सोनी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतमाता, येसूबाई सावरकर, लक्ष्मीबाई टिळक, डॉ. आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले यांची रूपे सादर करण्यात आली. कार्यक्रमात वनिता विकास मंडळ, दुर्गा महिला संस्था, श्रीरंग भक्ती, पंचगुरू, समर्थ, वैष्णवी आदी महिला संस्था सहभागी झाल्या होत्या.
यांचा झाला सन्मान...
मातृपूजन सोहळ्यासाठी पंचाहत्तरी गाठलेल्या परंतु विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कुमुद कुलकर्णी, इंदुमती काळे, विमलबाई लवाटे, सुशीला शिंपी, नलिनी काळकर, कमला दांडेकर, निर्मला कुबल, प्रमिला कोहोक, लीलावती पाटील, कमलाबाई माळोदे, सुनीता कुलकर्णी, प्रभा कुलकर्णी, नलिनी गोसावी, वत्सला भोसले, विमल काळे, कमला जोशी, वासंती जोशी आदींचा सत्कार करण्यात आला.

Web Title:  Unique Motherhood by 'We Were Surya'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक