शहरातील गुरुवारचा पाणीपुरवठा पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 01:05 AM2019-07-16T01:05:42+5:302019-07-16T01:06:06+5:30

गंगापूर धरणात पाणीसाठा वाढल्याने नाशिक महापालिकेने पाणीकपात अंशत: रद्द केली आहे. त्यानुसार दर गुरुवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा खंडित करून कोरडा दिवस पाळला जात होता.

 Undertake Thursday's water supply in the city | शहरातील गुरुवारचा पाणीपुरवठा पूर्ववत

शहरातील गुरुवारचा पाणीपुरवठा पूर्ववत

Next

नाशिक : गंगापूर धरणातपाणीसाठा वाढल्याने नाशिक महापालिकेने पाणीकपात अंशत: रद्द केली आहे. त्यानुसार दर गुरुवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा खंडित करून कोरडा दिवस पाळला जात होता. तो रद्द करण्यात आला आहे. मात्र संपूर्ण शहरात एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे.
महापालिकेत सोमवारी (दि.१५) आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या दालनात आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, महापौर रंजना भानसी यांच्याबरोबरच गटनेते आणि अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. महापौरांनी या निर्णयाची घोषणा केली.
शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात पुरेसा साठा कमी होत गेला. त्यातच धरणातील जलपातळी खालावली आणि निम्न पातळीवर पाणी घेणे महापालिकेला तांत्रिकदृष्ट्या शक्य नव्हते. त्यातच पावसाने ओढ दिल्याने नाशिककरांवर जलसंकट ओढवले होते. जुलैपर्यंत तरी शहराला पाणीपुरवठा होईल का, अशी शंका निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर महापौर रंजना भानसी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी धरणाची पाहणीदेखील केली होती. त्यानंतर आयुक्तांसमवेत प्रशासन आणि गटनेते यांच्यात बैठक झाली आणि त्यानंतर शहरात पाणीकपात करण्याचा निर्णय झाला होता.
त्यानुसार शहरात गेल्या ३० जूनपासून सर्व विभागात एकवेळ पाणीपुरवठा करण्यात येत आहे. महापालिकेच्या सहा पैकी चार विभागांत दोन वेळा पाणीपुरवठा होतो
तो एकवेळ करण्यात आला. त्यानंतरही तीन-चार दिवसांत पाणीपुरवठा न झाल्यास दर गुरुवारी ड्राय डे म्हणजे कोरडा दिवस पाळून पाणीपुरवठी करण्यात येईल असे ठरविण्यात आले होते. त्यानुसार ४ व ११ जुलै रोजी गुरुवारी शहरात ड्राय डे म्हणजेच कोरडा दिवस पाळण्यात आला होता. दरम्यान, जुलै महिन्याच्या प्रारंभीपासून इगतपुरी तसेच त्र्यंबकेश्वर आणि त्यानंतर गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणातील ५३ टक्के साठा झाला आहे. त्यामुळे पाणीकपात रद्द करावा, अशी मागणी जोर धरू लागली होती.
रविवारी (दि. १४) पालकमंत्री गिरीश महाजन यांनीदेखील आठ दिवसांत आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट केले होते. त्यांच्या सूचनेनुसारच सोमवारी (दि.१५) तातडीने आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या दालनात बैठक घेण्यात आली आणि गंगापूर धरणासह अन्य धरणांतील साठ्याचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार महापौरांनी गुरुवारी होणारी पाणीकपात रद्द केली. मात्र धरणातील साठा आणखी वाढत नाही तोपर्यंत संपूर्ण शहरात एकवेळ पाणीपुरवठ्याचा निर्णय कायम राहील, असे त्यांनी सांगितले.
या बैठकीस उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृह नेता सतीश सोनवणे, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, भाजपा गटनेता जगदीश पाटील, शिवसेना गटनेता विलास शिंदे, रिपाइं गटनेत्या दीक्षा लोंढे, अतिरिक्त आयुक्त संदीप नलावडे, कार्यकारी अभियंता पी. बी. चव्हाण यांच्यासह अन्य पदाधिकारीव कार्यकर्ते उपस्थित होते.
सानप यांनी फेटाळली...
आमदार देवयानी फरांदे यांनी गुरुवारी होणारी कपात रद्द करतानाच फक्त जुन्या नाशकात दोनवेळा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी या बैठकीत केली होती. त्यानुसार चर्चा झाली परंतु निर्णय झाला नाही. फरांदे यांनी पत्रकार परिषद हा निर्णयदेखील सांगण्याच प्रयत्न केला, मात्र आमदार बाळासाहेब सानप यांनी तेथेच आयुक्तांनी निर्णय आता घेतला आहे. असे सांगून या विषयाला बगल दिली, परंतु पत्रकार परिषदेतच आमदारांची जुगलबंदी पाहण्यास मिळाली.
कपातीमुळे वाचले
७५ दशलक्षघनफूट पाणी
महापालिकेने सर्व शहरात एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर दर गुरुवारी पाणीपुरवठा पूर्णत: बंद करण्याचा निर्णय घेतला. पंधरा दिवसांतच या निर्णयामुळे ७५ दशलक्षघनफूट पाण्याची बचत झाली, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता संदीप नलावडे यांनी दिली.

Web Title:  Undertake Thursday's water supply in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.