दुसऱ्याचे वेगळेपण समजून घेतल्यास ताणतणाव कमी : श्रुती पानसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 12:34 AM2019-07-18T00:34:45+5:302019-07-18T00:35:06+5:30

त्येक व्यक्ती ही भिन्न असते. त्याच्या मेंदूतील न्यूट्रॉन्सची जडणघडण पूर्णपणे वेगळी असते. त्यामुळे अगदी आपला सख्खा कुणी असला तरी तो किंवा ती पूर्णपणे भिन्न व्यक्तिमत्त्व आहे.

 Understanding the other person's tone reduces stress | दुसऱ्याचे वेगळेपण समजून घेतल्यास ताणतणाव कमी : श्रुती पानसे

दुसऱ्याचे वेगळेपण समजून घेतल्यास ताणतणाव कमी : श्रुती पानसे

Next

नाशिक : प्रत्येक व्यक्ती ही भिन्न असते. त्याच्या मेंदूतील न्यूट्रॉन्सची जडणघडण पूर्णपणे वेगळी असते. त्यामुळे अगदी आपला सख्खा कुणी असला तरी तो किंवा ती पूर्णपणे भिन्न व्यक्तिमत्त्व आहे. मग घराबाहेरची व्यक्ती तर पूर्णपणे भिन्न असते, हे एकदा समजून घेतले की माणसाला जीवनातले ताणतणाव कमी करणे शक्य असल्याचे मनोविश्लेषक डॉ. श्रुती पानसे यांनी सांगितले.
दवप्रभा प्रॉडक्शनच्या वतीने शिक्षणतज्ज्ञ भावना भार्गवे स्मृती व्याख्यानमालेत डॉ. श्रुती पानसे यांचे ‘मेंदूचा पासवर्ड’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ. पानसे यांनी जन्मापासून ते प्रौढ होण्यापर्यंतची मेंदूतील जडणघडण आणि त्याचे टप्पे उलगडून दाखवले. ज्या मुलाला दुसºया वर्षाच्या आसपास आपली भाषा बोलता येते, ते मूल सामान्य आहे, असे खुशाल समजावे. दोन वर्षांपर्यंत बालकांच्या मेंदूची कार्यक्षमता प्रचंड असल्याने त्याच्या आसपास घडणाºया कोणत्याही बाबी ते मूल चटकन शिकते. साधारणपणे चौथ्या वर्षापासून त्याच्यावर शिक्षणाचा बोजा टाकणे अपेक्षित नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्रत्येक व्यक्तीला जसे अनुभव मिळतात, तशी त्याच्या मेंदूची आणि व्यक्तिमत्वाची जडणघडण होते. नवनवीन प्रकारचे अनुभव घेतले तर मेंदूतही बदल घडतात. त्यामुळे माणसाने नेहमी आपला कम्फर्ट झोन सोडून दुसरं काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करायला हवे, असे पानसे यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या अखेरीस डॉ. पानसे यांनी उपस्थितांच्या समस्यांचे निराकरण केले. प्रा. वृंदा भार्गवे यांनी आभार मानले.
चार ते दहा या वयोगटांतील मुलांना भरपूर खेळू देणे, दंगामस्ती करू द्यावे, असेही त्यांनी नमूद केले, तर त्यानंतरच्या वयात मुले बंडखोर बनतात, पण अशा काळात त्यांना जबाबदारीचे काम द्यावे, त्याचे भान द्यावे, असेही पानसे यांनी नमूद केले. सोळाव्या वयाच्या आसपास मुला-मुलींमध्ये प्रचंड मानसिक अस्वस्थता असते. त्या काळात त्यांच्याशी मनमोकळा संवाद कायम राखणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Web Title:  Understanding the other person's tone reduces stress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक