उमराणेतील परसुल धरण कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 02:21 PM2019-04-04T14:21:04+5:302019-04-04T14:22:40+5:30

उमराणे : उमराणेसह परिसरातील आठ ते दहा गावांच्या पिण्याच्या पाण्याचे भवितव्य अवलंबून असणाऱ्या येथील परसुल धरणातील पाण्याने तळ गाठल्याने नागरिकांची चिंता वाढली असून यापुढील काळात या भागातील जनतेस तिव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

Umrane Parasul Dam Kondedak | उमराणेतील परसुल धरण कोरडेठाक

उमराणेतील परसुल धरण कोरडेठाक

googlenewsNext

उमराणे : उमराणेसह परिसरातील आठ ते दहा गावांच्या पिण्याच्या पाण्याचे भवितव्य अवलंबून असणाऱ्या येथील परसुल धरणातील पाण्याने तळ गाठल्याने नागरिकांची चिंता वाढली असून यापुढील काळात या भागातील जनतेस तिव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. उमराणे येथे ब्रिटिशकालीन परसुल धरण असुन या धरणातील पाण्यावर उमराणे व परिसरातील तिसगाव, दहिवड, रामवाडी आदी गावांसाठी पेयजल योजना कार्यान्वित आहे. परंतु चालुवर्षी तालुक्याच्या पुर्व भागासह धरण परिसरात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने हे धरण रिकामेच राहिले आहे.परिणामी मागील वर्षीच्या आरक्षीत कोट्यातील शिल्लक असलेल्या पाण्यावरच चालुवर्षीच्या पिण्याच्या पाण्याचे अत्यंत काटकसरीने आतापर्यंत नियोजन सुरु होते. शिवाय उपलब्ध साठ्यातुन गेल्या मिहनाभरापासुन परिसरातील सांगवी, कुंभार्डे, गिरणारे, तिसगाव, वर्हाळे, खारीपाडा आदी गावांसाठी या धरणातुन दररोज पाच ते सहा टॅकरद्वारे दिड ते दोन लाख लिटर पाणी उपसा केला जात होता.परिसरात परसुल धरणाव्यतिरिक्त कुठेही पाणीसाठा शिल्लक नसल्याने येथे दररोज तिन ते चार हजार शेळ्या मेंढ्या व गुरे पाण्याची तहान भागवत होते. पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर व सद्यस्थितीत उन्हाची तिव्रता वाढल्याने बाष्पीभवन होऊन धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. धरणातील उपलब्ध असलेले पाणी व मृतसाठा बघता गावासाठी जेमतेम पंधरा दिवस पुरेल एवढेच पाणी शिल्लक आहे. शिल्लक पाणी व लोकसंख्या बघता उमराणे गावासाठी दररोज नऊ लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. परंतु दुष्काळी परिस्थिती तब्बल सहा दिवसाआड अत्यल्प प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर वाड्या वस्त्यावर पाणी पोहचत नसल्याने तेथील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या काही गावांच्या पेयजल योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने तालुक्याच्या पुर्व भागातील गावात पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजना सुरु कराव्यात अशी मागणी जोर धरु लागली आहे. 

Web Title: Umrane Parasul Dam Kondedak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक