पेठरोडवर दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 01:44 AM2019-07-15T01:44:42+5:302019-07-15T01:45:46+5:30

आशेवाडीकडून नाशिककडे येत असताना तीव्र उतारावर दुचाकीला एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये निफाड तालुक्यातील दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना रविवारी (दि.१४) सायंकाळी घडली.

Two wheelers killed on Peth Road | पेठरोडवर दुचाकीस्वार ठार

पेठरोडवर दुचाकीस्वार ठार

Next

नाशिक : आशेवाडीकडून नाशिककडे येत असताना तीव्र उतारावर दुचाकीला एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये निफाड तालुक्यातील दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना रविवारी (दि.१४) सायंकाळी घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, श्यामराव बबनराव खालकर (३४, रा. भेंडाळी, ता. निफाड) हे त्यांच्या दुचाकीवरून सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पेठरोड येथून नाशिककडे येत होते. त्यावेळी मखमलाबाद शिवारातील बारीच्या उतारावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत खालकर रस्त्यावर कोसळले. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागून रक्तस्राव झाला.
दरम्यान, त्यांना महेश पिंगळे यांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.

Web Title: Two wheelers killed on Peth Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.