दुचाकीची अंत्ययात्रा अन् ढकलगाडी कॉँग्रेसचा विश्वासघात मोर्चा : काळे कपडे घालून कार्यकर्ते सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 01:33 AM2018-05-27T01:33:15+5:302018-05-27T01:33:15+5:30

नाशिक : केंद्रातील मोदी सरकारच्या कारकिर्दीला चार वर्षे पूर्ण झाले असून, या चार वर्षांत मोदी सरकारने जनतेचा विश्वासघात के ल्याचा आरोप करीत नाशिक शहर काँग्रेस कमिटीतर्फे शनिवारी (दि.२६) शहरातून मोर्चा काढूून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.

Two-wheeler tragedy and treachery Congress betrayal Front: Workers wearing black clothes and participating | दुचाकीची अंत्ययात्रा अन् ढकलगाडी कॉँग्रेसचा विश्वासघात मोर्चा : काळे कपडे घालून कार्यकर्ते सहभागी

दुचाकीची अंत्ययात्रा अन् ढकलगाडी कॉँग्रेसचा विश्वासघात मोर्चा : काळे कपडे घालून कार्यकर्ते सहभागी

googlenewsNext
ठळक मुद्दे सरकारने निव्वळ आश्वासने देऊन जनतेची फसवणूकच केल्याचा आरोप जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला

नाशिक : केंद्रातील मोदी सरकारच्या कारकिर्दीला चार वर्षे पूर्ण झाले असून, या चार वर्षांत मोदी सरकारने जनतेचा विश्वासघात के ल्याचा आरोप करीत नाशिक शहर काँग्रेस कमिटीतर्फे शनिवारी (दि.२६) शहरातून मोर्चा काढूून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
केंद्रात आणि राज्यातही भाजपाचे सरकार असून, या सरकारने निव्वळ आश्वासने देऊन जनतेची फसवणूकच केल्याचा आरोप काँग्रेसने केला असून, या सरकारच्या या फसवणुकीविरोधात व वाढत्या पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ शहर कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळ्या पट्ट्या बांधून व काळ्या रंगाचा पेहराव करून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. महिला नेत्या व कार्यकर्त्यांनीही काळ्या रंगाच्या साड्यांमध्ये मोर्चात सहभाग घेतला. काँग्रेस कमिटीच्या कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत चारचाकी वाहन ओढून व दुचाकीची अंत्ययात्रा काढून पेट्रोल व डिझेल दरवाढीचा विरोध करण्यात आला. यावेळी चार वर्षांत मोदी सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरल्याची टीका करताना सामान्य व्यक्तींचे जीवन जगणे या सरकारमुळे कठीण झाले असून, नुकत्याच इंधनाच्या दरात झालेली वाढ पाहता महागाईला आमंत्रण देण्यात आले आहे.

Web Title: Two-wheeler tragedy and treachery Congress betrayal Front: Workers wearing black clothes and participating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.