नाशिक : पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार सिडको हॉस्पिटलसमोर मंगळवारी (दि़ १२) राबविण्यात आलेल्या हेल्मेट ड्राइव्हदरम्यान कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाºयासोबत हुज्जत घालणाºया दोन दुचाकीधारकांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सिडको हॉस्पिटलसमोर करण्यात आलेल्या नाकाबंदीत पोलीस कर्मचारी अनिरुद्ध येवले हे विनाहेल्मेट दुचाकी चालविणाºयांवर कारवाई करीत होते़ त्यावेळी दुचाकीवरून आलेले (एमएच ४१ के ८१६६) संशयित सचिन शिवाजी चंद्रमोरे व सुनील पोपट भरीत यांच्याकडे हेल्मेट नसल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली़ यानंतर हे दोघे पुन्हा नाकाबंदीच्या ठिकाणी आले व काही कारण नसताना महिला पोलीस कॉन्स्टेबल गाढवे यांना उलट-सुलट बोलू लागले़ त्यांना काय झाले अशी विचारणा केली असता त्यांनी येवले यांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली़ तसेच खोटी केस करून तुझी वर्दी उतरवतो अशी धमकी देऊन सरकारी कामात अडथळा आणला़
याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे.