दुचाकीच्या धडकेत महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 01:42 AM2019-06-14T01:42:50+5:302019-06-14T01:44:02+5:30

जेलरोड श्रमिकनगर झोपडपट्टी येथे मोटारसायकलने दिलेल्या धडकेत महिला गंभीर जखमी होऊन ठार झाली असून, तिचा नातू जखमी झाला आहे.

Two-wheeler hit women | दुचाकीच्या धडकेत महिला ठार

दुचाकीच्या धडकेत महिला ठार

Next

नाशिकरोड : जेलरोड श्रमिकनगर झोपडपट्टी येथे मोटारसायकलने दिलेल्या धडकेत महिला गंभीर जखमी होऊन ठार झाली असून, तिचा नातू जखमी झाला आहे.
जेलरोड श्रमिकनगर येथील सुनीता संजय पाटील व नातू प्रीतेश पगार हे मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास श्रमिकनगर झोपडपट्टी महालक्ष्मी सोसायटीसमोरून रस्त्याने पायी जात होते. यावेळी हिरोहोंडा हॅँग कंपनीची मोटारसायकलचालक संतोष कैलास मुहे (२०) रा. साईनाथनगर याने जोरदार धडक दिल्याने सुनीता पाटील यांच्या पायास व डोक्यास गंभीर दुखापत होऊन त्या मयत झाल्या. तर नातू प्रीतेश हा जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Two-wheeler hit women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.