महिलांनी दळली दोन क्विंटल हळद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 11:22 PM2018-01-31T23:22:11+5:302018-01-31T23:58:39+5:30

प्रतिजेजुरी मºहळ येथील श्री खंडोबा महाराज यात्रेच्या पार्श्वभूमीवर देवाचा हळदी समारंभ बुधवारी अपूर्व उत्साहात पार पडला. जात्यावर सुमारे दोन क्विंटल हळद दळल्यानंतर काढण्यात आलेल्या मिरवणुकीत राज्यभरातून आलेल्या शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.

 Two quintals of turmeric mixed with the women | महिलांनी दळली दोन क्विंटल हळद

महिलांनी दळली दोन क्विंटल हळद

googlenewsNext

निºहाळे : प्रतिजेजुरी मºहळ येथील श्री खंडोबा महाराज यात्रेच्या पार्श्वभूमीवर देवाचा हळदी समारंभ बुधवारी अपूर्व उत्साहात पार पडला. जात्यावर सुमारे दोन क्विंटल हळद दळल्यानंतर काढण्यात आलेल्या मिरवणुकीत राज्यभरातून आलेल्या शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.  प्रतिजेजुरी म्हणून प्रसिद्धी पावलेल्या सिन्नर तालुक्यातल्या मºहळ येथील खंडोबा महाराज  यात्रेस गुरुवारी (दि. १) प्रारंभ होत आहे. यात्रेपूर्वी दळलेल्या हळद-भंडाºयाची मिरवणूक काढण्याची प्रथा आहे.  यात्रेपूर्वी रथसप्तमीपासून हळद दळण्याची तयारी केली जाते. मºहळ येथील जय मल्हार बचतगटाच्या अध्यक्ष सुनंदाबाई आढाव यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी जीपमधून प्रवास करीत नाशिक, पांगरी, सोमठाणे, निºहाळे, नांदूरशिंगोटे, दोडी, खंबाळे, वावी, येवला, वळदगाव, शिरसगाव लौकी, पिंपळखुटे, कोपरगाव, शिंगणापूर, तीन चारी, जोर्वे, संगमनेर, नाशिक या गावांतील महिलांना खोबºयाची वाटी व भंडारा देत यात्रेसाठी हळद दळण्याचे निमंत्रण दिले होते.
यात्रेपूर्वी जात्यावर दळलेली हळद घेऊन यायची, तिची गावातून मिरवणूक काढायची व यात्रेसाठी देवाच्या चरणी अर्पण करायची अशी परंपरा आहे. गावागावांतील महिला या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या.
पंधरा दिवसांपासून तयारी 
मºहळ येथील महिलांनी मारुती मंदिरात जाते रोवले. त्यावर १५ दिवसांपासून खंडोबाचे गाणे गात हळद दळण्यास प्रारंभ करून दोन क्विंटल हळद दळली तर गावागावांतूनही तेवढीच हळद घेऊन महिला टेम्पो, ट्रक आदी वाहने घेऊन दाखल झाल्या. मारुती मंदिरापासून हळदीची मिरवणूक सुरू झाली. देवाच्या चरणी भंडारा अर्पण करण्यात आला.

Web Title:  Two quintals of turmeric mixed with the women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.