दोन घरफोड्यांमध्ये पाच लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 11:35 PM2019-03-13T23:35:03+5:302019-03-14T00:05:55+5:30

जेलरोड येथे मुलीच्या लग्नात संपूर्ण कुटुंब मग्न असल्याची संधी शोधून अज्ञात चोरट्याने जेलरोड पंचक येथे घरफोडी करून सुमारे ३ लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

 Two lakh rupees in two houses are worth a lump sum | दोन घरफोड्यांमध्ये पाच लाखांचा ऐवज लंपास

दोन घरफोड्यांमध्ये पाच लाखांचा ऐवज लंपास

Next

नाशिकरोड : जेलरोड येथे मुलीच्या लग्नात संपूर्ण कुटुंब मग्न असल्याची संधी शोधून अज्ञात चोरट्याने जेलरोड पंचक येथे घरफोडी करून सुमारे ३ लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. तर दुसऱ्या घरफोडीत दोन लाखांचे दागिने असा एकूण दोन घरफोड्यांमध्ये पाच लाखांचा ऐवज चोरीस गेल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
जेलरोड पंचक जागृतीनगरमधील दीपलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये राहणारे स्वर्गीय गणेश धात्रक शिक्षण संस्थेचे संस्थापक दत्तात्रय फकिरा धात्रक यांच्या मुलीचे गोरज मुहूर्तावर लग्न होते. त्यामुळे धात्रक कुटुंबीय लग्नाच्या धावपळीत व्यस्त होते. या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने रविवारी सायंकाळी फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात अडकविलेल्या कोटमधून लॉकरची चावी काढून लॉकर उघडले. त्यातून सोन्याचे एक तोळा वजनाचे प्रत्येकी पाच वेढे, पाच तोळे वजनाच्या तीन सोन्याच्या चेन, अंगठ्या, डोरले, ठुशी व २१ हजार रुपये रोख असा एकूण २ लाख ९३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन लाखांची घरफोडी
जेलरोड लोखंडे मळा पुष्पकनगर येथील दुर्गा निवास येथे राहणारे चंद्रकांत सुभान शेवाळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, घराला कुलूप लावून सहकुटुंब बाहेरगावी गेले होते. त्यानंतर ते घरी परत आले असता त्यांना फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला आढळून आला. दरम्यानच्या काळात चोरट्याने फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून कपाटातील सोन्याच्या बांगड्या, चेन, अंगठी, सोन्याची नथ, मुलीचे कानातील टॉप्स, मंगळसूत्र असे एकूण १० तोळे वजनाचे २ लाख २ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले.

Web Title:  Two lakh rupees in two houses are worth a lump sum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.