Two directors of Sanko Bank are ineligible | समको बँकेचे दोन संचालक अपात्र
समको बँकेचे दोन संचालक अपात्र

सटाणा : सटाणा मर्चंट्स को-आॅपरेटिव्ह बँकेमध्ये (समको) सन २००४ मध्ये झालेल्या रोखे गैरव्यवहार प्रकरणी जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी तत्कालीन संचालक मंडळावर ठपका ठेवत विद्यमान संचालक रमेश देवरे व अशोक निकम यांचे संचालकपद रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. दरम्यान, या निर्णयाच्या विरोधात आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे अपात्र ठरलेल्या संचालकांनी सांगितले.
बँकेच्या तत्कालीन संचालकांनी सन २००४ मध्ये बेकायदेशीररीत्या १ कोटी १४ लाखांची बॉण्ड खरेदी केली होती. संचालक मंडळाच्या बैठकीचा कोरम पूर्ण नसताना झालेल्या या निर्णयास बँकेतील सात संचालकांनी विरोध करीत तक्र ार केल्यानंतर जिल्हा उपनिबंधंकांकडून विशेष लेखापरीक्षक (वर्ग-२) सुरेश महंत यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी दिलेल्या चौकशी अहवालात बँकेचे तत्कालीन प्रभारी अध्यक्ष अशोक निकम, संचालक रमेश देवरे, श्रीधर कोठावदे, राजेंद्र राका, अजय राका, माजी आमदार संजय चव्हाण, वसंत मुंडावरे, सुभाष ततार, व्यवस्थापक राजेंद्र डोळे यांना दोषी ठरविण्यात आले.


Web Title:  Two directors of Sanko Bank are ineligible
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.