दोघा भावांची चौघा संशयितांकडून लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:22 AM2018-07-21T00:22:44+5:302018-07-21T00:23:03+5:30

दुचाकीवरून जात असलेल्या दोन भावांना चौघा संशयितांनी अडवून जबर मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी बळजबरीने लुटून नेल्याची घटना गुरुवारी (दि़१९) रात्रीच्या सुमारास पाथर्डी फाटा परिसरातील आनंदनगरमध्ये घडली़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक केली आहे़

Two brothers robbed of four suspects | दोघा भावांची चौघा संशयितांकडून लूट

दोघा भावांची चौघा संशयितांकडून लूट

Next

नाशिक : दुचाकीवरून जात असलेल्या दोन भावांना चौघा संशयितांनी अडवून जबर मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी बळजबरीने लुटून नेल्याची घटना गुरुवारी (दि़१९) रात्रीच्या सुमारास पाथर्डी फाटा परिसरातील आनंदनगरमध्ये घडली़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक केली आहे़  कल्पेश पाटील (रा़ पाथर्डी फाटा)हे रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास आपल्या भावासमवेत दुचाकीवरून जात होते़ आनंदनगरमधील देवराज धनदायी रो-हाउसच्या समोरून जात असताना संशयित राजू गणेश कटाळे व त्याच्या इतर तीन साथीदारांनी दुचाकी अडविली़ यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गळ्यातील १८ हजार रुपये किमतीचा सोन्याच्या चेनमधील सहा ग्रॅम वजनाचा सोन्याचा तुकडा बळजबरीने ओढून पळवून नेला. इंदिरानगर पोलिसांनी संशयित राजू कटाळे यास अटक केली असून, उर्वरित तीन साथीदारांचा शोध सुरू आहे़
घरफोडीत सोन्याच्या  दागिन्यांची चोरी
घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी चौदा हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना सातपूरच्या डॉ. आंबेडकर चौकात गुरुवारी (दि़१९) पहाटे घडली़ श्यामराव काळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पहाटेच्या सुमारास त्यांचे आई-वडील घरात झोपलेले असताना चोरट्यांनी मागील दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले़ याप्रकरणी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
रोहित्राच्या सुट्या भागांची चोरी
जॉगिंग ट्रॅक बोगद्याजवळ असलेल्या २५ केव्ही रोहित्राचे मार्सन बनावटीचे तांबे व अ‍ॅल्युमिनियमचे २३ हजार रुपये किमतीचे सुटे भाग चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे़ या प्रकरणी वरुण वाघ यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सिडको परिसरात भुरट्या चोऱ्या वाढल्या आहेत.
बुलेटची चोरी
विनयनगरच्या वैष्णवी अपार्टमेंटमधील रहिवासी केतन शिरोळे यांची ७० हजार रुपये किंमतीची (एमएच ४१, एएच ३५४८) या क्रमांकाची बुलेट दुचाकी चोरट्यांनी सोसायटीच्या पार्किंगमधून चोरून नेली़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सावत्र बापाकडून लोखंडी रॉडने मारहाण
भाड्यासाठी पैसे दिले नाही म्हणून आईला मारहाण करीत असलेल्या वडीलांना विरोध केला असता त्यांनी पत्नीसह दोन मुलांना लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना कैलास नगरमध्ये गुरुवारी (दि़१९) घडली़ या प्रकरणी लोटण पूरण यादव (४०) विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Two brothers robbed of four suspects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.