नाशिक मनपा आयुक्तपदी तुकाराम मुंढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 12:27 AM2018-02-08T00:27:08+5:302018-02-08T00:30:13+5:30

नाशिक : बारा वर्षांच्या सेवाकाळात दहा बदल्यांचा अनुभव गाठीशी असलेले आणि आपल्या धडाकेबाज कामगिरीने परिचित असलेले तुकाराम मुंढे यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. विद्यमान आयुक्त अभिषेक कृष्ण यांची मुंबई एमआयडीसीच्या सहमुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. दरम्यान, तुकाराम मुंढे शुक्रवारी (दि.९) महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

Tukaram Mundhe, Nashik Municipal Commissioner | नाशिक मनपा आयुक्तपदी तुकाराम मुंढे

नाशिक मनपा आयुक्तपदी तुकाराम मुंढे

Next
ठळक मुद्देअभिषेक कृष्ण यांची बदलीउद्या स्वीकारणार पदभार

नाशिक : बारा वर्षांच्या सेवाकाळात दहा बदल्यांचा अनुभव गाठीशी असलेले आणि आपल्या धडाकेबाज कामगिरीने परिचित असलेले तुकाराम मुंढे यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. विद्यमान आयुक्त अभिषेक कृष्ण यांची मुंबई एमआयडीसीच्या सहमुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. दरम्यान, तुकाराम मुंढे शुक्रवारी (दि.९) महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
नाशिक महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या बदलीची चर्चा गेल्या तीन-चार महिन्यांपासून सुरू होती. अखेर, बुधवारी (दि.७) दुपारी कृष्ण यांच्या बदलीचे आदेश निघाले. कृष्ण यांच्या जागेवर सध्या पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मूळचे बीड जिल्ह्णातील असलेले तुकाराम मुंढे यांनी सोलापूर, जालना याठिकाणी जिल्हाधिकारी, नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नवी मुंबई महापालिका आयुक्त तसेच विक्री व कर विभागाचे सहआयुक्त म्हणून काम पाहिले आहे. सन २००९ मध्ये त्यांनी नाशिकला आदिवासी आयुक्तालयात अतिरिक्त आयुक्त म्हणूनही कार्यभार सांभाळलेला आहे. गेल्या १२ वर्षांत तुकाराम मुंढे यांची दहा वेळा बदली झालेली आहे. नवी मुंबई, सोलापूर येथील त्यांची कारकीर्द गाजलेली आहे. शुक्रवारी (दि.९) तुकाराम मुंढे पदभार स्वीकारणार आहेत. दरम्यान, मावळते आयुक्त अभिषेक कृष्ण यांची बदली मुंबई एमआयडीसीच्या सह मुख्य कार्यकारी अधिकारीपदी झाली आहे. अभिषेक कृष्ण यांनी दि. ८ जुलै २०१६ रोजी महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता. आपल्या १९ महिन्यांच्या कारकिर्दीत अभिषेक कृष्ण यांनी अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यात प्रामुख्याने, गेल्या २० वर्षांपासून प्रलंबित असलेला भंगार बाजार अतिक्रमणचा प्रश्न निकाली काढला. याशिवाय, खतप्रकल्प, वेस्ट टू एनर्जी, उद्यानांची देखभाल-दुरुस्ती, नगररचना विभागात आॅटो डीसीआर प्रणाली, झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण, अपंग पुनर्वसन कायद्याची अंमलबजावणी, घंटागाडी या प्रश्नांना हात घालत गुंता सोडविला. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात महापालिकेच्या उत्पन्नात सुमारे ४१ कोटींनी वाढ झाली.
सानप यांनी घेतली भेट
आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या बदलीचे वृत्त समजताच आमदार बाळासाहेब सानप यांनी महापालिका मुख्यालयात येत कृष्ण यांची भेट घेऊन चर्चा केली. कृष्ण यांची बदली रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती बाहेर भाजपाचे नगरसेवक देत होते. परंतु, कृष्ण यांना बदलीचे आदेश प्राप्त झाले होते. याशिवाय, पालकमंत्र्यांनीही कृष्ण यांचेशी चर्चा केल्याचे समजते. परंतु, थेट मुख्यमंत्र्यांकडूनच मुंढे यांची नियुक्ती झाल्याची चर्चा असल्याने सत्ताधारी भाजपासह विरोधकांनीही प्रतिक्रिया नोंदविताना सावध पवित्रा घेतला आहे. दरम्यान, अभिषेक कृष्ण यांनी आपण गुरुवारी पदभार सोडणार असल्याचे सांगत अधिक भाष्य टाळले तर महापालिकेतील सत्ताधाºयांसह विरोधी पक्षातील पदाधिकाºयांनाही त्यांनी भेट देणे टाळले.
अधिकारी, नगरसेवकांमध्ये धास्ती
महापालिका आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्याची वार्ता पसरताच महापालिकेतील अधिकारी, कर्मचाºयांसह नगरसेवकही धास्तावले. मुंढे यांची आजवरची कारकीर्द पाहता नाशिक महापालिकेतही तोच अध्याय पुढे चालू राहणार असल्याने सत्ताधारी भाजपातही चिंतेची लहर पसरली आहे. विरोधी पक्षाने तर सावध भूमिका घेत त्यावर भाष्य करणे टाळले आहे.
 

Web Title: Tukaram Mundhe, Nashik Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक