उलगडला चंद्रापर्यंतचा प्रवास...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 01:11 AM2019-07-22T01:11:09+5:302019-07-22T01:11:32+5:30

अमेरिकेच्या ‘नासा’ या आंतरराष्टय अंतराळ संस्थेच्या माध्यमातून १९६९ साली मानवाने अपोलो- ११ या चंद्रयानाच्या माध्यमातून पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवले होते. यानाच्या चंद्रस्वारीला ५० वर्षे पूर्ण झाली असून, अंतराळ संशोधनाच्या इतिहासात ही मोहीम एक सुवर्ण नोंद ठरली.

 Travel to the moon in the open ... | उलगडला चंद्रापर्यंतचा प्रवास...

उलगडला चंद्रापर्यंतचा प्रवास...

Next

नाशिक : अमेरिकेच्या ‘नासा’ या आंतरराष्टय अंतराळ संस्थेच्या माध्यमातून १९६९ साली मानवाने अपोलो- ११ या चंद्रयानाच्या माध्यमातून पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवले होते. यानाच्या चंद्रस्वारीला ५० वर्षे पूर्ण झाली असून, अंतराळ संशोधनाच्या इतिहासात ही मोहीम एक सुवर्ण नोंद ठरली. अमेरिकेसह जगभरातील शास्त्रज्ञांच्या संशोधनाला यानंतर एक वेगळीच दिशा मिळाली. पृथ्वीच्या पल्ल्याड मानवाचे हे प्रथम पाऊल होते. या रोमांचकारी मोहिमेच्या आठवणींना उजाळा देत अपोलो-११ यानाची अद्भुत स्वारी विद्यार्थ्यांसह नागरिकांनी जणू प्रत्यक्षच अनुभवली.
निमित्त होते, मानवाच्या चंद्रावरील पहिल्या पदस्पर्शाच्या सुवर्णजयंतीचे औचित्यावर रविवारी (दि.२१) नॅशनल स्पेस सोसायटीची नाशिक शाखा व मविप्र संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सीएमसीएस महाविद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अपोलो-११ यानाच्या ऐतिहासिक मोहिमेत सहभागी झालेले अंतराळ संशोधक, शास्त्रज्ञांनी आॅनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाषण व प्रेझेंटेन्शनद्वारे या मोहिमेवर प्रकाशझोत टाकला. मोहिमेच्या विविध बाजू, त्यासाठी करण्यात आलेली विशेष तयारी याविषयी माहिती देत मानवाच्या प्रथम चंद्रस्वारीच्या प्रवासाचे पट उलगडून सांगितले.
१० जुलै १९६९ साली यानाचे कमांडर नील आर्मस्ट्रॉँग, कमांड मॉड्यूल पायलट एडविन बज एल्ड्रिन व लुनार मॉड्यूल पायलट मायक ल कॉलिन्स यांनी चंद्रावर प्रथम पाऊल ठेवले. या अपोलो-११ यानाच्या मिशनसाठी करण्यात आलेल्या तयारीपासून आर्मस्ट्रॉँगचे चंद्रावरील पहिले पाऊलपर्यंतचा प्रवास उपस्थिताना थक्क करून गेला. यावेळी व्यासपीठावर मविप्रचे शिक्षणधिकारी एस. के. शिंदे, सोसायटीचे अविनाश शिरोडे, सचिव प्रा. डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी, विजय बाविस्कर उपस्थित होते.
शास्त्रज्ञांनी साधला संवाद
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आॅनलाइन अमेरिकन अंतराळ शास्त्रज्ञ डॉ. अ‍ॅमी बेरा, रॉन जॉन्स, पिटर कॉक, स्टिफन अ‍ॅकर्ली यांच्याशी अविनाश शिरोडे यांनी संवाद साधत अपोलो-११ यान मोहिमेचा प्रवास उपस्थितांसमोर उलगडून दाखविला. अपोलो-११ची चंद्रस्वारी, चंद्रावर पाऊल ठेवणारे आर्मस्ट्रॉँग आदी पैलूंवर यावेळी शास्त्रज्ञांनी थेट प्रकाश टाकला.
पाच वर्षांनी पुन्हा गाठणार चंद्र
४अपोलो-११ यान या मोहिमेत नील आर्मस्टॉँगसह अन्य शास्त्रज्ञ २ तास ३२ मिनिटे चंद्रावर थांबले होते. यासाठी अब्जावधी रु पयांचा खर्च करण्यात आला होता. ‘नासा’कडून २०२४ साली पुन्हा ‘बॅक टू स्टे आॅन मून’ ही मोहीम राबविली जाणार आहे. यानिमित्ताने पाच वर्षांनी पुन्हा मानव चंद्र गाठणार असल्याचीही माहिती यावेळी अविनाश शिरोडे यांनी दिली.

Web Title:  Travel to the moon in the open ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.