सप्तशृंगगडावर पर्यटकांची वर्दळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 08:23 PM2018-08-12T20:23:30+5:302018-08-12T20:24:41+5:30

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व पर्यटनस्थळ समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर उंचावरून कोसळणारे धबधबे व धुक्यासह पावसाचा आनंद घेण्यासाठी भाविक व पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढली आहे.

Tourists' rise in Saptashringagad | सप्तशृंगगडावर पर्यटकांची वर्दळ

सप्तशृंगगडावर पर्यटकांची वर्दळ

Next

दोन महिन्यांपासून परिसरात पाऊस सातत्याने बरसत आहे. त्यामुळे परिसर हिरवाईने नटला असून, अद्भुत अशा निसर्गसौंदर्याची भुरळ पर्यटकांना पडत आहे. नांदुरीपासून सप्तशृंगगडाकडे दहा किलो मीटरच्या नागमोडी वळणाच्या घाटाची सफर करताना घनदाट हिरवेगार असे जंगल व उंच डोंगरावरून दुधासारखे पांढरे शुभ्र कोसळणारे धबधबे दिसून येतात. हेच मनमोहक धबधबे पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. घाटात प्रवास करताना रस्त्याच्या मधोमध वळणावर मोठा धबधबा असल्याने पर्यटक तिथे मोठ्या प्रमाणात भिजण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. घाटमाथ्यावर पिकनिक पॉइंटजवळ आल्यावर समोरच उंचावर असलेल्या मार्कंडेय ऋषींचा पर्वत व हजार ते दीड हजार फूट खोल दरी बघण्यासाठी भाविक व पर्यटक गर्दी करीत आहेत.

Web Title: Tourists' rise in Saptashringagad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.