तवली वनोद्यान ठरणार पर्यटन केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 12:30 AM2018-05-13T00:30:54+5:302018-05-13T00:30:54+5:30

अमृत अभियान योजना हरित क्षेत्र विकास प्रकल्प अंतर्गत महानगरपालिका कार्यक्षेत्रातील स. नं. ४०० मध्ये तवली डोंगर येथे सुमारे १७.५ एकर जागेत विकसित होणाऱ्या अमृत वनोद्यानाच्या कामांची पाहणी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी (दि.१२) करत आवश्यक त्या सूचना केल्या. सदरचे काम ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचेही त्यांनी आदेशित केले.

Tourism center to be considered as Tavli Wanidan | तवली वनोद्यान ठरणार पर्यटन केंद्र

तवली वनोद्यान ठरणार पर्यटन केंद्र

googlenewsNext

नाशिक : अमृत अभियान योजना हरित क्षेत्र विकास प्रकल्प अंतर्गत महानगरपालिका कार्यक्षेत्रातील स. नं. ४०० मध्ये तवली डोंगर येथे सुमारे १७.५ एकर जागेत विकसित होणाऱ्या अमृत वनोद्यानाच्या कामांची पाहणी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी (दि.१२) करत आवश्यक त्या सूचना केल्या. सदरचे काम ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचेही त्यांनी आदेशित केले.या वनोद्यानात प्रामुख्याने नैसर्गिक पाथवे, दगडकाम याबरोबरच वृक्षारोपण, फळझाडे, आयुर्वेदिक औषधी फुलझाडे यांची जास्त लागवड करून पक्ष्यांकरिता घरटे, पाणी व्यवस्था करणे आणि जैवविविधता टिकवून ठेवण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या. तसेच स्थापत्य विषयक कामाबाबत व कंपोस्ट पिटच्या कामाबाबतही त्यांनी सूचना दिल्या. याप्रसंगी शहर अभियंता संजय घुगे, उपआयुक्त हरिभाऊ फडोळ आदींसह अधिकारीवर्ग उपस्थित होता. अमृत वनोद्यान टेकडीवर असल्याने नाशिक शहरातील नागरिकांना व बाहेरून येणाºया पर्यटकांना आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

Web Title: Tourism center to be considered as Tavli Wanidan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :forestजंगल