‘बॉर्डर बंद’मुळे ऐन हंगामात टमाटा गडगडला ; शेतकºयांना आर्थिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 12:05 AM2017-11-25T00:05:47+5:302017-11-25T00:33:56+5:30

गेल्या महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने झोडपल्याने टमाट्याच्या पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसल्यामुळे ऐन हंगामात टमाट्याच्या बाजारभाव गडगडल्याने टमाटा उत्पादक शेतकºयांना आर्थिक नुकसान सहन करावे लागलेच त्यातच गेल्या तीन महिन्यांपासून भारत-पाकिस्तान सीमारेषा बंद असल्याने पाकिस्तानला पाठविल्या जाणाºया टमाटा मालाची निर्यात पूर्णपणे बंद आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या केवळ २५ ते ३० टक्के टमाटा मालाची आवक होत असून, टमाट्याला प्रति जाळी ७०० ते ८०० रुपयेपर्यंत बाजारभाव मिळत आहे. किरकोळ बाजारात टमाटा ६० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने विक्र ी होत आहे.

 Tomato collapsed due to 'border closure'; Financial losses to farmers | ‘बॉर्डर बंद’मुळे ऐन हंगामात टमाटा गडगडला ; शेतकºयांना आर्थिक नुकसान

‘बॉर्डर बंद’मुळे ऐन हंगामात टमाटा गडगडला ; शेतकºयांना आर्थिक नुकसान

Next
ठळक मुद्दे तीन  महिन्यांपासून भारत-पाकिस्तान सीमारेषा बंद टमाटा मालाची निर्यात पूर्णपणे बंद प्रति जाळी ७०० ते ८०० रुपयेपर्यंत बाजारभाव

संदीप झिरवाळ ।
पंचवटी : गेल्या महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने झोडपल्याने टमाट्याच्या पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसल्यामुळे ऐन हंगामात टमाट्याच्या बाजारभाव गडगडल्याने टमाटा उत्पादक शेतकºयांना आर्थिक नुकसान सहन करावे लागलेच त्यातच गेल्या तीन  महिन्यांपासून भारत-पाकिस्तान सीमारेषा बंद असल्याने पाकिस्तानला पाठविल्या जाणाºया टमाटा मालाची निर्यात पूर्णपणे बंद आहे.  नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या केवळ २५ ते ३० टक्के टमाटा मालाची आवक होत असून, टमाट्याला प्रति जाळी ७०० ते ८०० रुपयेपर्यंत बाजारभाव मिळत आहे. किरकोळ बाजारात टमाटा ६० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने विक्र ी होत आहे. आॅगस्ट ते डिसेंबर असा पाच महिन्यांचा कालावधी टमाटा हंगामाचा असतो मात्र यंदा गेल्या आॅक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले. इतरवेळी हंगामात एकरी किमान २०० टमाटा जाळी निघायच्या तेथे आज ५० जाळ्याच टमाटे निघाले आहेत.
परतीचा पाऊस त्यातच भारत-पाकिस्तान सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने १५ आॅगस्टपासून भारत-पाकिस्तान सीमारेषा बंद करण्यात आल्याने पाकिस्तानला टमाटा मालाची निर्यात बंद झाली आहे. हंगामात एकट्या नाशिक जिल्ह्यातून अंदाजे जवळपास १०० ट्रकभर टमाटा माल दैनंदिन पाकिस्तानला रवाना केला जायचा. मात्र आता सीमारेषा बंद असल्याने पाकिस्तानला टमाट्याची निर्यात सध्या बंदच आहे. 
...तर टमाट्याने शंभरी गाठली असती 
आॅगस्ट ते डिसेंबर हा टमाट्याचा हंगाम असून, या कालावधीत मोठ्या प्रमाणात टमाट्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र यंदा शेतकºयांनी टमाट्याची लागवड केली खरी, परंतु ऐनवेळी परतीच्या पावसाने टमाटा पिकाला फटका बसला. पावसामुळे टमाट्याचे उभे पीक नाश पावले. त्यातच भारत-पाकिस्तान सीमारेषा तणावामुळे बंद आहे. परतीच्या पावसाचा फटका बसला नसता तर भारत-पाकिस्तान सीमारेषा बंद नसती तर टमाट्याला पाकिस्तानात १४०० ते १५०० रुपये प्रति जाळी बाजारभाव मिळाला असता व नाशिकमध्ये टमाट्याने किलोमागे किमान शंभरीचा बाजारभाव तरी गाठला असता.

Web Title:  Tomato collapsed due to 'border closure'; Financial losses to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.