आज वाजणार शाळेची पहिली घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 12:43 AM2019-06-17T00:43:18+5:302019-06-17T00:43:46+5:30

नवा कोरा गणवेश, खांद्यावर नवे दप्तर आणि नव्या वर्गाबद्दलची चेहऱ्यावर न लपणारी उत्सुकता अशा उत्साहपूर्ण वातावरणात नव्या शैक्षणिक वर्षात शाळेची सोमवारी (दि.१७) पहिली घंटा वाजणार असून, गेल्या दीड महिन्यापासून शांत असलेली शाळांची प्रांगणे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून जाणार आहेत.

 Today's first hour of school | आज वाजणार शाळेची पहिली घंटा

आज वाजणार शाळेची पहिली घंटा

Next

नाशिक : नवा कोरा गणवेश, खांद्यावर नवे दप्तर आणि नव्या वर्गाबद्दलची चेहऱ्यावर न लपणारी उत्सुकता अशा उत्साहपूर्ण वातावरणात नव्या शैक्षणिक वर्षात शाळेची सोमवारी (दि.१७) पहिली घंटा वाजणार असून, गेल्या दीड महिन्यापासून शांत असलेली शाळांची प्रांगणे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून जाणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी शाळांच्या प्रवेशद्वाराजवळ रांगोळ्या काढण्यात येणार असून, शाळेत नव्याने दाखल होणाºया विद्यार्थ्यांचे अनेक ठिकाणी गुलाबपुष्प देऊन, काही ठिकाणी खाऊ देऊन तर काही ठिकाणी औक्षण करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. शाळांनी पुस्तकवाटपासह विविध कार्यक्रमांचे नियोजन केले असून, काही शाळांनी स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छतेचा संदेश देण्याचे नियोजन केले आहे. काही शाळांमध्ये पताका लावून विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी केली आहे. विनाअनुदानित आणि खासगी शाळांमध्ये नवा गणवेश, नवे दप्तर घेऊन विद्यार्थी पालकांबरोबर शाळेमध्ये येताना दिसून येणार असताना शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ स्वत: शिक्षक फुले देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करताना दिसणार आहेत. तर दुसरीकडे पहिल्यांदाच शाळेची पायरी चढणाºया बालवर्गातल्या विद्यार्थ्यांचे रडणे-ओरडणे होऊ नये त्यासाठी काही शिक्षक खाऊ घेऊन उभे असलेले दिसून येतील. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने सर्वच विद्यार्थ्यांचे पालक त्यांना शाळेत सोडायला येतील. त्यातच पहिल्यांदाच शाळेत येणाºया विद्यार्थ्यांच्या पालकांची पावले गेटजवळच घुटमळणार असल्याने शहरातील जवळपास सर्वच शाळांचा परिसर आज गजबजून जाणार आहे.
नवे पुस्तक, नवा गणवेश, नवी शाळा आणि नवे सवंगडी असे सारे काही नवे नवे सोबत घेऊन नव्या शैक्षणिक वर्षाला सुरूवात होणार आहे. शाळांमध्ये पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचेदेखील वाटप होणार आहे.

Web Title:  Today's first hour of school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.