'Tipper': Three years of life war | ‘टिप्पर’ टोळी युद्धातील तिघांना जन्मठेप
‘टिप्पर’ टोळी युद्धातील तिघांना जन्मठेप

ठळक मुद्देचव्हाण खून प्रकरण : सिडकोतील दोन गटांतील गुन्हेगारीला आळा

नाशिक : सिडकोतील कुविख्यात टिप्पर गँगमधून बाहेर पडून दुसऱ्या गँगमध्ये सामील झालेला अजिंक्य चव्हाण हा टिप्परचा इन्फॉर्मर असल्याच्या संशयावरून त्याचा धारदार शस्त्र व गोळी झाडून खून करणाºया तिघा आरोपींना जिल्हा न्यायाधीश एऩ जी़ गिमेकर यांनी शुक्रवारी (दि़११) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर उर्वरित दोघांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. संदीप भालचंद्र वाघ (२३, रा़राजरत्ननगर, सिडको), योगेश रघुनाथ मराठे (२२, रा़साईबाबानगर, सिडको) व दिनेश राजाराम पाटील (२५, रा़उपेंद्रनगर, सिडको) अशी शिक्षा ठोठावल्याची नावे आहेत़
१८ जून २०१६ रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास अंबडच्या गणपती मंदिराजवळ अजिंक्य चव्हाण याचा आरोपींनी खून केला होता़ सिडकोतील टिप्पर गँगमधील अजिंक्य चव्हाण हा आरोपी संदीप वाघ, योगेश मराठे, दिनेश पाटील, योगेश निकम व गणेश घुसळे (रा़उपेंद्रनगर, सिडको) यांच्या गँगमध्ये सामील झाला होता़ आपल्या गँगची गोपनीय माहिती अजिंक्य हा टिप्पर गँगमधील शकीर पठाण व गणेश वाघ ऊर्फ गण्या कावळ्या यांना पुरविल व ते आपला बदला घेतील अशी भीती आरोपींना वाटत होती़ त्यांनी आपल्या गँगची माहिती टिप्परला न देण्याबाबत अजिंक्य यास वारंवार समजावूनही सांगितले होते़ मात्र अजिंक्य त्यांचे ऐकत नसल्याने त्यांनी अजिंक्यला ठार मारण्याचा कट रचला़
१८ जून २०१६ रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास आरोपी दिनेश पाटील याने अजिंक्यच्या मोबाइलवर फोन करून त्यास बोलावून घेतले़ यानंतर पाटील, निकम व घुसळे यांनी व विधीसंघर्षित बालक यांनी त्यास दारू पाजून एऩ एम़ स्वीट््सच्या मागे आणले़‘टिप्पर’ टोळी युध्दातील तीघांना जन्मठेप
(पान १ वरून)
यानंतर आरोपींनी चव्हाण यास टिप्पर गँगला आमची माहिती का देतो असे बोलून संदीप वाघ याने अजिंक्यवर गोळी झाडली तर योगेश मराठे याने आपल्याकडील चाकूने वार करून खून केला़ यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी पळून जाऊन त्यांच्या अंगावरील रक्ताने माखलेले कपडे जाळून टाकले़ याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात पाचही आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता़
अंबड पोलीस ठाण्यात दाखल या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष खडके यांनी करून आरोपींविरोधात सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़ न्यायाधीश गिमेकर यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील रवींद्र एल. निकम यांनी फिर्यादी, साक्षीदार व पंच, तपासी अंमलदार असे १३ साक्षीदार तपासून आरोपींविरोधात परिस्थितीजन्य पुरावे सादर केले़ त्यानुसार आरोपी संदीप वाघ यास जन्मठेप व २५ हजार रुपये दंड, योगेश मराठे यास जन्मठेप व दहा हजार रुपये दंड, तर दिनेश पाटील यास जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़
या खटल्यात सरकारी वकील व पोलीस यांना पैरवी अधिकारी पोलीस नाईक सी़ एम़ सुळे, पोलीस हवालदार डी़ एम़ बागुल व पोलीस नाईक आऱ आऱ जाधव यांनी सहाय्य केले़
 


Web Title: 'Tipper': Three years of life war
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.