Tilakwadi Signal: Invite to Accidents in Barricades of Police | टिळकवाडी सिग्नल : पोलिसांचा खटाटोप;अपघातांना निमंत्रण
टिळकवाडी सिग्नल : पोलिसांचा खटाटोप;अपघातांना निमंत्रण

ठळक मुद्देजुन्या पंडित कॉलनीच्या वळणावर पोलिसांकडून बॅरिकेड लावण्यात आलेले नाहीरोगापेक्षा आता इलाज भयंकर झाल्याच्या प्रतिक्रियाबॅरिकेड असून अडचण, नसून खोळंबा अशी स्थिती

नाशिक : जुन्या पंडित कॉलनीमधील एकेरी वाहतुकीचा नियम अंमलात आणण्याचा पोलिसांचा खटाटोप अपघातांना निमंत्रण देणारा ठरत आहे. या नियमाच्या अंमलबजावणीसाठी टिळकवाडी सिग्नलवर लावलेले बॅरिकेड हे वाहनचालकांच्या जिवावर बेतण्याची शक्यता आहे. तरण तलावाकडे जाणारे वाहनचालक या बॅरिकेडपुढे जाऊन वाहने उभी करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बॅरिकेड असून अडचण, नसून खोळंबा अशी स्थिती निर्माण झाली आहे.
टिळकवाडी सिग्नलवरून पुढे तरण तलाव सिग्नल अथवा कॅनडा कॉर्नर आणि सीबीएसच्या दिशेने मार्गक्रमण करण्यास शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून बंदी घालण्यात आली. हा उपाय जुन्या पंडित कॉलनीत निर्माण होणा-या वाहतूक कोंडीच्या समस्येवर पोलिसांनी शोधून काढला आहे. रस्त्यावर उभ्या राहणा-या चारचाकी वाहनांमुळे दुहेरी वाहतुकीसाठी हा रस्ता कमी पडत असताना पोलिसांनी अवैधरीत्या पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करण्याऐवजी एकेरी वाहतूक सुरू केली; मात्र एकूणच रोगापेक्षा आता इलाज भयंकर झाल्याच्या प्रतिक्रिया संतप्त नागरिकांकडून उमटत आहेत.

एकेरी वाहतुकीचा फज्जा
सरकारवाडा पोलीस ठाण्याकडून येणारी वाहतूक शहर वाहतूक शाखेला अपेक्षित असल्याप्रमाणे सरळ मॅरेथॉन चौकापर्यंत न जाता जुन्या पंडित कॉलनीतून वळण घेत टिळकवाडी सिग्नलवरून पुढे मार्गस्थ होत आहे. यामुळे एकेरी वाहतूक नियमाच्या अंमलबजावणीपेक्षा फज्जा अधिक उडाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. जुन्या पंडित कॉलनीच्या वळणावर पोलिसांकडून बॅरिकेड लावण्यात आलेले नाही, त्यामुळे वाहने सर्रास वळण घेत सिग्नलपर्यंत येतात आणि येथे बॅरिकेड बघून पुन्हा माघारी न जाता बॅरिकेडच्या पुढे किंवा शेजारी उभे राहून सीबीएस-कॅनडाकॉर्नरचा सिग्नल लागताच अचानकपणे पुढे वाहने दामटवितात; मात्र यावेळी विरुद्ध बाजूच्या सुटणा-या सिग्नलमुळे वाहने समोरासमोर येऊन अपघाताची स्थिती उद्भवते.


Web Title: Tilakwadi Signal: Invite to Accidents in Barricades of Police
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.