तीन मजली इमारत कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 01:34 AM2019-07-09T01:34:48+5:302019-07-09T01:35:06+5:30

मखमलाबाद नाका परिसरातील हेमकुंजजवळ असलेली अंदाजे चाळीस वर्षे जुनी धोकादायक हर्षवर्धन सोसायटीची तीनमजली इमारत सोमवारी (दि.८) मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास कोसळल्याची घटना उघडकीस आली आहे.

 Three-storey building collapsed | तीन मजली इमारत कोसळली

तीन मजली इमारत कोसळली

googlenewsNext

पंचवटी : मखमलाबाद नाका परिसरातील हेमकुंजजवळ असलेली अंदाजे चाळीस वर्षे जुनी धोकादायक हर्षवर्धन सोसायटीची तीनमजली इमारत सोमवारी (दि.८) मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास कोसळल्याची घटना उघडकीस आली आहे. या दुर्घटनेत सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिली. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे इमारतीचा जीर्ण झालेला भाग मध्यरात्रीच्या सुमारास पत्त्याच्या इमल्याप्रमाणे कोसळला. यावेळी एक युवक इमारतीत अडकल्याची माहिती मिळताच जवानांनी त्याला बाहेर काढले.
मखमलाबाद नाक्यावर हर्षवर्धन सोसायटी असून, सदर इमारत अंदाजे चाळीस वर्षे जुनी आहे. गेल्या काही दिवसांपासून इमारत धोकेदायक झाल्याने इमारतीतील अनेक सदस्यांनी अन्यत्र स्थलांतर केले होते. त्यामुळे इमारत कधीही कोसळण्याची शक्यता वर्तविली जात होती. मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास्ा इमारत पूर्णपणे कोसळली. इमारत कोसळल्याचा मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी तत्काळ अग्निशामन दल व पोलिसांना माहिती कळविली. त्यानंतर घटनास्थळी पंचवटी पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक धनश्री पाटील, सुरेश नरवडे, संदीप शेळके, महेश साळुंखे, विलास चारोस्कर व पंचवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत पडलेल्या इमारतीच्या पाठीमागील बाजूस राहत असलेल्या सोनू दुसाने याला सुखरूपपणे बाहेर काढले. पंचवटी, जुने नाशिक या भागातील धोकादायक वाडे, इमारतींच्या भिंती ढासळू लागल्याने दुर्घटनेची शक्यता असल्याने सतर्क राहण्याचा इशारा मनपा आपत्ती व्यवस्थापनाक डून देण्यात आला आहे.
वृक्ष उन्मळले
गंगाघाट परिसरातील शुक्ल यजुर्वेद ब्राह्मण संस्था कार्यालयजवळ सोमवारी (दि.८) पहाटे पावसामुळे वड आणि पिंपळ असे दोन वृक्ष कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे पंचवटी महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title:  Three-storey building collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.