नाशिक : माथेफिरू नातवाने चुलत आजोबांसह तिघांची निर्घृण हत्या केल्याची थरारक घटना, मंगळवारी सकाळी नांदगाव तालुक्यातील हिंगणेदेहरे येथे घडली. रवींद्र पोपट बागुल (२८) असे हल्लेखोराचे नाव असून, यात अन्य दोघे जखमी झाले आहेत. गावकºयांनी रवींद्रला बेदम चोप देत, पोलिसांच्या स्वाधीन केले.
भाऊ प्रवीणच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपासून रवींद्रचे मानसिक संतुलन बिघडल्याने, त्याला सापुताराजवळील चिखली येथे मांत्रिकाकडे नेण्यात आले होते. तेथून हिंगणे येथे परततानाही त्याने प्रवीणचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला होता.
मंगळवारी सकाळी ६च्या सुमारास आरडाओरड करत, रवींद्र चुलत आजोबा केशव कचरू बागुल (६५) यांच्या घरी पोहोचला आणि त्यांच्या डोक्यात कुºहाड घालून त्यांचा खून केला. त्यानंतर, त्याने गावाबाहेरून जाणाºया रस्त्याकडे जात दूध घेऊन जाणाºया सुभाष बच्छाव (५५) यांच्यावर कुºहाडीने हल्ला चढविला. त्यांचाही जागेवरच मृत्यू झाला. त्यानंतर, शेतात जात असलेल्या विक्र म पवार (६०) यांचाही त्याने खून केला. या वेळी त्याला रोखण्याचा प्रयत्न करणाºया दोन ग्रामस्थांना त्याने जखमी केले. अखेर शेजारच्या तांड्यावरील ग्रामस्थांनी रवींद्रला बेदम चोप देत, त्याला पोलिसांच्या हवाली केले.