तीन महिने पत्र पडून : नागरिकांचे मात्र हाल सुरू ‘आधार यंत्र’ आणायला प्रशासनाला नाही वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 01:26 AM2018-06-01T01:26:27+5:302018-06-01T01:26:27+5:30

नाशिक : नागरिकाला आधार कार्डासाठी सक्ती केली जात असताना केंद्रांच्या अपुऱ्या संख्येमुळे नागरिकांना दिवसभर एकीकडे रांगा लावाव्या लागत असताना जळगाव जिल्ह्यात अतिरिक्त ठरलेले ३५ आधार यंत्रे नाशिक जिल्ह्याला देण्याची तयारी यूआयडीने दर्शवूनही जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे गेल्या तीन महिन्यांपासून आधार यंत्रे जळगावी पडून असल्याचे वृत्त आहे.

For three months, the letter is written: No time the administration has to take 'Aadhar Yojana' to start the citizens | तीन महिने पत्र पडून : नागरिकांचे मात्र हाल सुरू ‘आधार यंत्र’ आणायला प्रशासनाला नाही वेळ

तीन महिने पत्र पडून : नागरिकांचे मात्र हाल सुरू ‘आधार यंत्र’ आणायला प्रशासनाला नाही वेळ

Next
ठळक मुद्देअधिकारी, कर्मचाºयांना वेळ नसल्याचे कारणअंगठे व माहिती गायब झाल्याने नागरिक हवालदिल

नाशिक : शासनाकडून प्रत्येक नागरिकाला आधार कार्डासाठी सक्ती केली जात असताना आधार केंद्रांच्या अपुऱ्या संख्येमुळे नागरिकांना दिवसभर एकीकडे रांगा लावाव्या लागत असताना जळगाव जिल्ह्यात अतिरिक्त ठरलेले ३५ आधार यंत्रे नाशिक जिल्ह्याला देण्याची तयारी यूआयडीने दर्शवूनही जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे गेल्या तीन महिन्यांपासून आधार यंत्रे जळगावी पडून असल्याचे वृत्त आहे. आधार यंत्र आणण्यासाठी अधिकारी, कर्मचाºयांना वेळ नसल्याचे त्यामागे कारण दिले जात आहे.
काही वर्षांपूर्वी नागरिकांनी शासनाने ठरवून दिलेल्या खासगी कंपन्यांच्या आधार केंद्रावर जाऊन आधार कार्ड काढले. परंतु गेल्या वर्षी आधार अपडेशन करण्याच्या प्रक्रियेत शासनाने सर्व खासगी कंपन्यांकडून आधारचे काम काढून घेत शासनाकडूनच आधार यंत्र पुरविण्याचे ठरविले. यात हजारो नागरिकांनी यापूर्वी आधार काढूनही त्यांचे अंगठे व माहिती गायब झाल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.
शासनाने निश्चित केलेले आधार केंद्रांची संख्या जिल्ह्यात जेमतेम १२२ इतकी असून, दिवसाकाठी फक्त ३० ते ३५ लोकांचीच आधारची नोंदणी होत असल्याने नागरिकांना थेट दोन, दोन महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. दुसरीकडे केंद्र व राज्य सरकार तसेच निमशासकीय व खासगी कंपन्यांनीही आता प्रत्येकाला आधार कार्ड सक्तीचे व अनिवार्य केले असल्यामुळे आधार यंत्रांच्या अपुºया संख्येमुळे आधारची गरज असलेल्या नागरिकांची आर्थिक पिळवणूकही होत असल्याच्या तक्रारी आहेत.
अशा परिस्थितीत जळगाव जिल्ह्याला दिल्लीच्या यूआयडीने पुरविलेले आधार यंत्रे अतिरिक्त ठरले आहेत. नाशिक जिल्ह्याची असलेल्या मागणीचा विचार करता ३५ यंत्रे जळगावने नाशिकला देण्याची तयारी दर्शविली असून, तसे पत्रही नाशिक जिल्हा प्रशासनाला तीन महिन्यांपूर्वी पाठविले आहे.

Web Title: For three months, the letter is written: No time the administration has to take 'Aadhar Yojana' to start the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.