दुचाकी चोरीचे सत्र सुरूच तीन घटना : टोळी सक्रिय असल्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 12:59 AM2018-03-05T00:59:16+5:302018-03-05T00:59:16+5:30

नाशिक : शहरातील विविध उपनगरीय भागांमधून दुचाकी चोरी जाण्याचे प्रकार सातत्याने घडत असून, शनिवारी (दि.३) दिवसभरात तीन दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

Three incidents of two-wheeler theft: Suspicion of the gang being active | दुचाकी चोरीचे सत्र सुरूच तीन घटना : टोळी सक्रिय असल्याचा संशय

दुचाकी चोरीचे सत्र सुरूच तीन घटना : टोळी सक्रिय असल्याचा संशय

Next
ठळक मुद्देतीस हजार रुपये किमतीची स्प्लेंडर मोठी टोळी सक्रिय असल्याची चर्चा सुरू

नाशिक : शहरातील विविध उपनगरीय भागांमधून दुचाकी चोरी जाण्याचे प्रकार सातत्याने घडत असून, शनिवारी (दि.३) दिवसभरात तीन दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. एकूणच शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून, यामागे टोळी सक्रिय असल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त होत आहे. शहरातील पंचवटील, गंगापूर, सिडको, उपनगर, रविवार कारंजा आदी भागांमधून चोरट्यांकडून दुचाकी लंपास केल्या जात आहे. आठवडाभरापुर्वी तीन ते चार दुचाकीचोरी गेल्याचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाले होते. या गुन्ह्यांचा छडा लागत नाही तोच पुन्हा पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कालिकानगर येथील रहिवासी प्रवीण देवीदास काळे यांच्या मालकीची सुमारे तीस हजार रुपये किमतीची स्प्लेंडर प्लस (एम.एच.१५ सीएल ८५०९) चोरट्यांनी लंपास केली. दुसºया घटनेत गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कॉलेजरोडवरील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या वाहनतळामध्ये संजय सुकदेव घोडके यांनी उभी केलेली अ‍ॅक्टिवा (एम.एच१५ एफके ७९१४) चोरट्यांनी पळवून नेली. तिसºया घटनेत अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहत्या घरासमोरून हेमंत छबुलाल सोनारे यांची दुचाकी (एम.एच १५ टीए १४४७) चोरट्यांनी लंपास केली. एकूणच दुचाकी चोरीच्या घटनांनी शहरात डोके वर काढले असून यामागे चोरट्यांची मोठी टोळी सक्रिय असल्याची चर्चा सुरू आहे. भरदिवसा सर्रासपणे दुचाकीचोरी होऊ लागल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

Web Title: Three incidents of two-wheeler theft: Suspicion of the gang being active

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर