रात्रीत फोडले तीन फ्लॅट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 12:53 AM2019-05-15T00:53:18+5:302019-05-15T00:54:27+5:30

पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत मंगळवारी (दि.१३) पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तारवालानगर परिसरातील दोन अपार्टमेंटमध्ये तीन फ्लॅटचे कुलूप तोडून सुमारे २ लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे.

Three flats in the night | रात्रीत फोडले तीन फ्लॅट

रात्रीत फोडले तीन फ्लॅट

Next

नाशिक : पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत मंगळवारी (दि.१३) पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तारवालानगर परिसरातील दोन अपार्टमेंटमध्ये तीन फ्लॅटचे कुलूप तोडून सुमारे २ लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे.
शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, मागील दहा दिवसांमध्ये चोरट्यांनी विविध भागांमध्ये तब्बल वीस घरे फोडून लाखो रुपयांचा ऐवज लुटला आहे. पंचवटीत मंगळवारी पहाटे तीन फ्लॅट चोरट्यांनी फोडल्याने तारवालानगर परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. तारवालानगरमधील रोही अपार्टमेंटमधील रहिवासी अंबादास अशोक बोडके यांच्या सदनिकेत प्रवेश करून चोरट्याने सुमारे २ लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज लुटून जबरी चोरी केली आहे. यामध्ये सोन्याचे दागिने, रोख रकमेचा समावेश आहे. तसेच शिवशक्ती संकुलामधील १३ क्रमांकाच्या सदनिकेत राहणारे अनिल महादू सानप यांचे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने ४३ हजारांचा ऐवज तर प्रकाश खंडेराव आव्हाड यांच्या घरातून २० हजार रुपये असा एकूण ६३ हजारांचा ऐवज लुटला. या तीन घटनांमध्ये तब्बल २ लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज चोरी गेला आहे.

Web Title: Three flats in the night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.