धरणात मोजका पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 10:33 PM2018-10-23T22:33:46+5:302018-10-23T22:35:53+5:30

सिन्नर : यावर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाल्याने टंचाईच्या संकटाचे सावट गडद होऊ लागले आहे. तालुक्यातील प्रत्येक धरणात मोजकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने आहे ते पाणी वर्षभर टिकविण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे. धरणातील पाणीसाठा मोजका असल्याने आरक्षण लवकरात लवकर ठरवून, आहे ते पाणी राखण्यासाठी प्रशासनाला काळजी घ्यावी लागणार आहे अन्यथा पाणीटंचाईची तीव्रता भयानक होण्याची चिन्हे आत्तापासूनच दिसू लागली आहे.

Thick water storage in the dam | धरणात मोजका पाणीसाठा

सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणात सध्या शिल्लक असलेला पाणीसाठा.

Next
ठळक मुद्देप्रशासनाची कसरत : सिन्नरला पाणी नियोजनाची गरज

सिन्नर : यावर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाल्याने टंचाईच्या संकटाचे सावट गडद होऊ लागले आहे. तालुक्यातील प्रत्येक धरणात मोजकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने आहे ते पाणी वर्षभर टिकविण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे. धरणातील पाणीसाठा मोजका असल्याने आरक्षण लवकरात लवकर ठरवून, आहे ते पाणी राखण्यासाठी प्रशासनाला काळजी घ्यावी लागणार आहे अन्यथा पाणीटंचाईची तीव्रता भयानक होण्याची चिन्हे आत्तापासूनच दिसू लागली आहे.
तालुकाभरात यंदा एकही जोरदार पाऊस न पडल्याने सर्वच बंधारे, पाझर तलाव व नदी-नाले कोरडेठाक पडले आहेत. यावर्षी पाण्याची पातळी आॅक्टोबरमध्येच तळाशी गेली आहे. प्रत्येक धरणात मोजकाच पाणीसाठा आहे. सध्या ११ गावे ८२ वाड्यावस्त्यांवर टॅँकरच्या फेऱ्या सुरू आहेत. १४ खासगी व तीन शासकीय टॅँकरच्या दररोज ६५ फेºया कराव्या लागत असल्याने आॅक्टोबर महिन्यातच टंचाईची अवस्था निदर्शनास येते आहे. नवीन गावांचेही टॅँकर मागणीचे प्रस्ताव आले आहेत. सहा गावांचे ३० ते ३५ वाड्यावस्त्यांचे प्रस्ताव पंचायत समितीकडे प्राप्त झाले असून, मंजुरीसाठी ते पाठविण्यात येणार आहेत. यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने तालुक्याच्या सर्वच भागात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. यंदा केवळ उशिराच्या पावसाने तालुक्याच्या पश्चिम भागातील बंधारे भरले होते. तालुक्यातील धरणांतील पाणीसाठ्यावर पिण्याच्या पाण्याची भिस्त आहे. धरणातील पाणीसाठ्याची सद्य:स्थितीभोजापूर धरण साठवण क्षमता (३६१ दशलक्ष घनफूट) - पैकी शिल्लक साठा २४९ (६८.९७%), ठाणगाव येथील उंबरदरी (५०. ३० दशलक्ष घनफूट )- सध्या शिल्लक ३०.६२ (६०%), कोनांबे धरण साठवण क्षमता (४७ दशलक्ष घनफूट) - शिल्लक ३०.६७ (६५.२५%), सरदवाडी धरण साठवण (क्षमता ६५ दशलक्ष घनफूट) - ३२.१५ (४९.४६%), बोरखिंड धरण साठवण क्षमता (५५ दशलक्ष घनफूट) - शिल्लक ३७.०४ (६७.३४%) आजमितीस इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. सन २०१८-२०१९ या वर्षाकरिता पाणी आरक्षणाबाबत तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपअभियंता पाणीपुरवठा विभाग यांच्या संयुक्तरीत्या अहवाल पाठविण्यात आला आहे. सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणाची साठवण क्षमता ३६१ दशलक्ष घनफूट असून, त्यातून मनेगावसह पाणी योजनेसाठी ३०.५२, कणकोरी योजनेसाठी ८.९५, चास, नळवाडी, सोनेवाडी, कासारवाडी या गावांसाठी ९.७० व निºहाळे/फत्तेपूर, घोटेवाडी, माळवाडी बंधाºयासाठी ४.३९ असे मिळून ५३.५६ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे.
सर्वच धरणांतून शेतीसाठीही पाण्याचा उपसा सुरू असल्याचे चित्र आहे. पिण्याच्या पाण्यासाठी विविध पाणी योजनांतून होणारा उपसा, परवाना घेतलेल्या लिप्ट योजना या सर्व बाबींचा विचार केल्यास उन्हाळ्यात या धरणांमध्ये किती पाणी शिल्लक राहील यावर आरक्षित गावांची तहान कशी भागेल, असा प्रश्न निर्माण होत आहे.

सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणात सध्या शिल्लक असलेला पाणीसाठा. प्रशासनाची कसरत : सिन्नरला पाणी नियोजनाची गरजधरणात मोजका पाणीसाठासिन्नर : यावर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाल्याने टंचाईच्या संकटाचे सावट गडद होऊ लागले आहे. तालुक्यातील प्रत्येक धरणात मोजकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने आहे ते पाणी वर्षभर टिकविण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे. धरणातील पाणीसाठा मोजका असल्याने आरक्षण लवकरात लवकर ठरवून, आहे ते पाणी राखण्यासाठी प्रशासनाला काळजी घ्यावी लागणार आहे अन्यथा पाणीटंचाईची तीव्रता भयानक होण्याची चिन्हे आत्तापासूनच दिसू लागली आहे.
तालुकाभरात यंदा एकही जोरदार पाऊस न पडल्याने सर्वच बंधारे, पाझर तलाव व नदी-नाले कोरडेठाक पडले आहेत. यावर्षी पाण्याची पातळी आॅक्टोबरमध्येच तळाशी गेली आहे. प्रत्येक धरणात मोजकाच पाणीसाठा आहे. सध्या ११ गावे ८२ वाड्यावस्त्यांवर टॅँकरच्या फेऱ्या सुरू आहेत. १४ खासगी व तीन शासकीय टॅँकरच्या दररोज ६५ फेºया कराव्या लागत असल्याने आॅक्टोबर महिन्यातच टंचाईची अवस्था निदर्शनास येते आहे. नवीन गावांचेही टॅँकर मागणीचे प्रस्ताव आले आहेत. सहा गावांचे ३० ते ३५ वाड्यावस्त्यांचे प्रस्ताव पंचायत समितीकडे प्राप्त झाले असून, मंजुरीसाठी ते पाठविण्यात येणार आहेत. यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने तालुक्याच्या सर्वच भागात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. यंदा केवळ उशिराच्या पावसाने तालुक्याच्या पश्चिम भागातील बंधारे भरले होते. तालुक्यातील धरणांतील पाणीसाठ्यावर पिण्याच्या पाण्याची भिस्त आहे. धरणातील पाणीसाठ्याची सद्य:स्थितीभोजापूर धरण साठवण क्षमता (३६१ दशलक्ष घनफूट) - पैकी शिल्लक साठा २४९ (६८.९७%), ठाणगाव येथील उंबरदरी (५०. ३० दशलक्ष घनफूट )- सध्या शिल्लक ३०.६२ (६०%), कोनांबे धरण साठवण क्षमता (४७ दशलक्ष घनफूट) - शिल्लक ३०.६७ (६५.२५%), सरदवाडी धरण साठवण (क्षमता ६५ दशलक्ष घनफूट) - ३२.१५ (४९.४६%), बोरखिंड धरण साठवण क्षमता (५५ दशलक्ष घनफूट) - शिल्लक ३७.०४ (६७.३४%) आजमितीस इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. सन २०१८-२०१९ या वर्षाकरिता पाणी आरक्षणाबाबत तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपअभियंता पाणीपुरवठा विभाग यांच्या संयुक्तरीत्या अहवाल पाठविण्यात आला आहे. सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणाची साठवण क्षमता ३६१ दशलक्ष घनफूट असून, त्यातून मनेगावसह पाणी योजनेसाठी ३०.५२, कणकोरी योजनेसाठी ८.९५, चास, नळवाडी, सोनेवाडी, कासारवाडी या गावांसाठी ९.७० व निºहाळे/फत्तेपूर, घोटेवाडी, माळवाडी बंधाºयासाठी ४.३९ असे मिळून ५३.५६ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे.
सर्वच धरणांतून शेतीसाठीही पाण्याचा उपसा सुरू असल्याचे चित्र आहे. पिण्याच्या पाण्यासाठी विविध पाणी योजनांतून होणारा उपसा, परवाना घेतलेल्या लिप्ट योजना या सर्व बाबींचा विचार केल्यास उन्हाळ्यात या धरणांमध्ये किती पाणी शिल्लक राहील यावर आरक्षित गावांची तहान कशी भागेल, असा प्रश्न निर्माण होत आहे.

Web Title: Thick water storage in the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.