गणेशगाव येथील विद्युत पोल नवीन बसवावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 07:44 PM2019-01-19T19:44:31+5:302019-01-19T19:45:47+5:30

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गणेशगाव (वाघेरा) येथील वीज पुरवठा अनेक दिवसांपासुन बंद आहे. ग्रामीण भागाकडे विद्युत विभाग उदासिनतेने पाहात आहे.

There will be new buses for electric poles in Ganeshgaon | गणेशगाव येथील विद्युत पोल नवीन बसवावेत

गणेशगाव येथील विद्युत पोल नवीन बसवावेत

Next
ठळक मुद्देआठ दिवस विज पुरवठा बंद : सरपंचांनी मांडली कैफियत

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गणेशगाव (वाघेरा) येथील वीज पुरवठा अनेक दिवसांपासुन बंद आहे. ग्रामीण भागाकडे विद्युत विभाग उदासिनतेने पाहात आहे.
असे गणेशगाव (वाघेरा) येथील सरपंच रुख्मिणी उदार यांनी आपली कैफीयत मांडली.
त्या म्हणाल्या गणेशगावला विजेचे सडलेले पोल त्वरीत काढुन नवीन पोल टाकावेत. कारण सडलेल्या पोलला मोठमोठी भोके पडल्याने लहान मुले खेळता खेळता त्यात गंमत म्हणुन हात पाय घालतात.परिणामी अपघात होतात. भविष्यात त्यामुळे मोठा अनर्थ घडू शकतो.
याशिवाय लोंबकळणाऱ्या तारा यामुळे देखील प्राणघातक प्रसंग ओढवु शकतो. अशा लोंबकळणाºया तारा खराब झालेले पोल त्वरीत बदलावेत. सद्या मुलांच्या स्कॉलशिपच्या परीक्षा सुरु आहेत. तसेच मार्चमध्ये वार्षिक परीक्षा सुरु होतील. यासाठी सुरळीत वीज पुरवठ्याची गरज असल्याने याकडे वेळीच लक्ष देण्याची मागणी सरपंचांनी केली आहे.
उपसरपंच सुनिता जाधव, सदस्य वेण खोटरे, शरद महाले, केशव खोटरे तसेच सामाजिक कार्यकर्ते नथु उदार आदींनी केली आहे. मुलांची स्कॉलरशिप परीक्षा आहे.

Web Title: There will be new buses for electric poles in Ganeshgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.