कळवण तालुक्यात भुकंपाची नोंद नाही ;मात्र धक्क्यांची होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 02:27 PM2017-12-04T14:27:46+5:302017-12-04T14:32:03+5:30

कळवण तालुक्यातील दळवट, लिंगामे, भाकुर्डी, जामले हतगड या भागात दरवर्षी भुकंपाचे सौम्य धक्के बसत असल्यामुळे या पंचक्रोशीत राहणाºया नागरिकांमध्ये कायमच भिती व चिंतेचे वातावरण आहे, जनतेने घाबरून जाऊ नये यासाठी वेळोवेळी प्रशासनाकडून जनजागृती केली जात असली तरी ती तात्पुरती मलमपट्टी ठरली आहे.

There is no record of earthquake in Kalwan taluka; | कळवण तालुक्यात भुकंपाची नोंद नाही ;मात्र धक्क्यांची होणार चौकशी

कळवण तालुक्यात भुकंपाची नोंद नाही ;मात्र धक्क्यांची होणार चौकशी

Next
ठळक मुद्देतहसिलदारांकडून भेट : तज्ज्ञांना करणार पाचारणगेल्या ४८ तासात कुठलीही नोंद झालेली नसल्याने प्रशासकीय यंत्रणा बुचकळ्यात पडली

नाशिक : कळवण तालुक्यातील दळवटसह पाच ते सहा गावांना भुकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने ग्रामस्थांमध्ये भयभयीत वातावरण झालेले असले तरी, राज्यातील कानाकोप-यातील भुगर्भातील हालचालींची नोंद ठेवणाºया ‘मेरी’च्या भुकंप मापक यंत्रावर मात्र गेल्या ४८ तासात कुठलीही नोंद झालेली नसल्याने प्रशासकीय यंत्रणा बुचकळ्यात पडली आहे. ‘सुपर सोनीक बुम’मुळे धक्के जाणवल्याची शक्यता प्रशासनाने नाकारलेली नाही, तथापि, जनतेत निर्माण झालेली भिती पाहता तहसिलदार कैलास चावडे यांनी तातडीने संबंधित गावांना भेटी देवून जनतेचे प्रबोाधन केले आहे.
कळवण तालुक्यातील दळवट, लिंगामे, भाकुर्डी, जामले हतगड या भागात दरवर्षी भुकंपाचे सौम्य धक्के बसत असल्यामुळे या पंचक्रोशीत राहणाºया नागरिकांमध्ये कायमच भिती व चिंतेचे वातावरण आहे, जनतेने घाबरून जाऊ नये यासाठी वेळोवेळी प्रशासनाकडून जनजागृती केली जात असली तरी ती तात्पुरती मलमपट्टी ठरली आहे. शनिवार व रविवारी पुन्हा धक्के बसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी तालुक्यातीलच ओतुर येथेही मध्यरात्री भुकंपाचे जोरदार धक्के बसल्याचे नागरिकांचे म्हणणे होते, परंतु प्रत्यक्षात त्याची भुकंप मापक यंत्रावर नोंद झाली नव्हती. त्यामुळे प्रशासन त्या धक्क्यांना भुकंपाचे धक्के मानण्यास तयार नव्हती, मात्र ओतुर व परिसरातील नागरिकांनी त्यानंतर किती तरी दिवस रात्रीच्या वेळी घराबाहेरच झोपणे पसंत केले होते. कळवण तालुक्यात सातत्याने जमीनीला बसणाºया हादºयांबाबत यापुर्वी ‘मेरी’ या संशोधन संस्थेच्या अधिकाºयांनी प्रत्यक्ष गावांना भेटी देवून पाहणी केली आहे, परंतु अंतीम निष्कर्ष कधीच निघाला नाही, तथापि, भुकंपाचे धक्के साधारणत: पावसाळा संपल्यानंतर दिवाळी सणाच्या आसपास बसत असल्याचे आजवरच्या घटनांमधून लक्षात आले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जमीनीत मुरून भुगर्भागील हालचालींमुळे अंतर्गत पोकळी निर्माण होऊन धक्के जाणवत असावे असे जाणकारांचे म्हणणे आहे. चार वर्षापुर्वी अशाच धक्क्यांची दखल घेत तत्कालीन जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला असता, दिल्ली व कोलकत्ता येथील भुगर्भ शास्त्रज्ञांनी कळवण तालुक्यातील संवेदनशील गावांना भेटी देवून पाहणी केली होती, परंतु त्यातूनही फारसे काही होऊ शकले नाही.
नागरिकांना अलिकडे जाणवलेले धक्के हे कदाचित ‘सुपर सोनीक बुम’ म्हणजेच आकाशात झेपावणाºया मोठ्या विमानांच्या डोंगर, दरी भागात मोठा आवाज होतो व त्या आवाजातूनच सदरचा प्रकार घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: There is no record of earthquake in Kalwan taluka;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.