पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:21 AM2018-04-22T00:21:23+5:302018-04-22T00:21:23+5:30

शहरासह राज्य व देशभरात वर्षभरापूूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत थोडी जरी वाढ झाली तरी, सर्वत्र गोंधळ होत असल्याचे पहायला मिळत होते. परंतु, गेल्या सात ते आठ महिन्यांपासून शहरात इंधनाच्या किमतीत रोजच्या बदलामुळे नियमितपणे हळूहळू वाढ होत असून, शहरात पेट्रोलचे दर जवळपास पाच ते सहा रुपयांनी, तर डिझेल दहा ते अकरा रुपयांनी महागले आहे.

There is anger against petrol and diesel prices | पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात संताप

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात संताप

Next

नाशिक : शहरासह राज्य व देशभरात वर्षभरापूूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत थोडी जरी वाढ झाली तरी, सर्वत्र गोंधळ होत असल्याचे पहायला मिळत होते. परंतु, गेल्या सात ते आठ महिन्यांपासून शहरात इंधनाच्या किमतीत रोजच्या बदलामुळे नियमितपणे हळूहळू वाढ होत असून, शहरात पेट्रोलचे दर जवळपास पाच ते सहा रुपयांनी, तर डिझेल दहा ते अकरा रुपयांनी महागले आहे. या दरवाढीविरोधात नाशिककर संताप व्यक्त करीत असून, पेट्रोलियम पदार्थांनाही जीएसटी अंतर्गत आणण्याची मागणी केली जात आहे. केंद्र सरकारने गेल्या १६ जून २०१७ पासून डायनॅमिक फ्यूल प्राइसिंगच्या माध्यमातून प्रतिदिन रिव्हाइज रिटेल फ्यूल प्राइस सिस्टिमची सुरु वात केली असून, तेव्हापासून नाशिकमध्ये पेट्रोलच्या दरात ६.५३ रु पये प्रति लिटरने वाढ होऊन ते ८२.३६ रुपये प्रतिलिटर झाले आहे, तर डिझेलच्या किमतीत १८.३ रुपयांनी वाढ झाली असून, ते ६८.९५ रुपये प्रतिलिटरने विकले जात आहे. त्यामुळे नाशिककरांमध्ये संतापाचे वातावरण असून, शहरवासीयांकडून पेट्रोलियम पदार्थांवर जीएसटी लावण्याची मागणी केली जात आहे. पेट्रोलच्या दरात चढ-उतार होत असला तरी किमान इंधनावरील कर कमी होऊन पेट्रोल व डिझेलच्या किमती कमी होतील, अशी नाशिककरांना अपेक्षा आहे. पेट्रोलच्या किमती वाढण्याचे मुख्य कारण डायनॅमिक फ्यूल प्राइसिंगप्रणाली असून, प्रतिदिन रिव्हाइज रिटेल फ्यूल प्राइस सिस्टीमची सुरुवात गेल्या १६ जूनला लागू करण्यात आली. या सिस्टीमनुसार आंतरराष्ट्रीय बाजारात असलेल्या कच्च्या तेलाच्या किमतीनुसारच बाजारातील पेट्रोलच्या किमतीत चढ-उतार होत आहेत. ही पद्धत लागू केल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घट झाली होती. मात्र, त्यानंतर सात त्याने इंधनाच्या किमतीत वाढ होत असून, ही वाढ हळुवार होत असल्याने त्यावर कुणाचेही लक्ष गेले नाही.
चार वर्षांतील उच्चांक
पेट्रोल व डिझेलच्या किमतींनी गेल्या चार वर्षांतील उच्चांक गाठला असून, सोशल मीडियातूनही पेट्रोल व डिझेल दरवाढीला विरोध होऊ लागला आहे. पेट्रोल व डिझेलच्या वाढणाऱ्या किमतीची आकडेवारी व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक व टष्ट्वीटरच्या माध्यमातून शेअर करून सरकारविरोधात संताप व्यक्त होत आहे.

Web Title: There is anger against petrol and diesel prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.