सोमेश्वर कॉलनीतून दुचाकीची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 01:22 AM2019-01-14T01:22:53+5:302019-01-14T01:23:47+5:30

सातपूरच्या सोमेश्वर कॉलनीतील तिडके मळा परिसरातून चोरट्यांनी ५० हजार रुपयांची किमतीची दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली असून, याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Theft of Two Wheels in Someshwar Colony | सोमेश्वर कॉलनीतून दुचाकीची चोरी

सोमेश्वर कॉलनीतून दुचाकीची चोरी

Next

नाशिक : सातपूरच्या सोमेश्वर कॉलनीतील तिडके मळा परिसरातून चोरट्यांनी ५० हजार रुपयांची किमतीची दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली असून, याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमेश्वर कॉलनीत सुनील सोमनाथ पालवे याने घराजवळ लावलेली एमएच १५ जीपी ७२६८ या क्रमांकाची दुचाकी गुरुवारी (दि.९) रात्री ८ ते शुक्रवारी (दि. १०)सकाळी ६ वाजेदरम्यान अज्ञातांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिवारी (दि.१२) सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार धात्रक पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सातपूर, श्रमिकनगर, गंगापूररोड, गंगापूरगाव आदी भागात भुरट्या चोऱ्या वाढल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
साडेनऊ लाखांची फसवणूक
नाशिकरोड : विहितगांव सौभाग्यनगर येथील बंगल्याबाबत व्यंकटेश देवस्थानच्या परवानगीची माहिती न देता साठेखत करून साडेनऊ लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पद्माकर बापुराव कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ३ मे २०१६ ते २७ मार्च २०१८ या काळात संशयित रवींद्र परशराम ओझा रा. जगताप मळा याने स्वत:च्या मालकीचा रोहाऊस करिता व्यंकटेश देवस्थान परवानगीबाबत माहिती न देता व एचडीबी फायनान्शियल सर्व्हीसेसचा सदर बंगल्यावर बोजा असतांना देखील १७ मे २०१८ रोजी साठेखत करून दिले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Theft of Two Wheels in Someshwar Colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.